चुनाभट्टी प्रकरण : अत्याचारित मुलीचा तपास अहवाल सादर करा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

जालना येथील तरुणीवर मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात पाशवी बलात्कार करण्यात आला. यानंतर उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात या मुलीच्या मृत्यू झाला. याप्रकरणी राज्य महिला आयोग आणि स्वतःहून दखल घेत या प्रकरणाची चौकशी तसेच तपास कुठपर्यंत आला याची माहिती पत्राद्वारे वरिष्ठ पोलिसांकडून मागवली आहेत. 31 ऑगस्टपर्यंत ही माहिती आयोगाला सादर करण्याचे आदेश पत्रात नमूद करण्यात आले.

औरंगाबाद : जालना येथील तरुणीवर मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात पाशवी बलात्कार करण्यात आला. यानंतर उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात या मुलीच्या मृत्यू झाला. याप्रकरणी राज्य महिला आयोग आणि स्वतःहून दखल घेत या प्रकरणाची चौकशी तसेच तपास कुठपर्यंत आला याची माहिती पत्राद्वारे वरिष्ठ पोलिसांकडून मागवली आहेत. 31 ऑगस्टपर्यंत ही माहिती आयोगाला सादर करण्याचे आदेश पत्रात नमूद करण्यात आले.

जालना जिल्ह्यातील या तरुणीवर सात जुलै रोजी चुनाभट्टी परिसरात पाशवी बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर या मुलीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान 29 ऑगस्टला ग या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर राज्य महिला आयोगातर्फे याप्रकरणी स्वतः दखल घेत. नोंद गुन्ह्यातील आरोपी चा शोध घेऊन अटक केलेली कारवाई, तसेच तपास कामाचा आढावा अहवालासह व्यक्तिशः 31 ऑगस्टपर्यंत आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.

पत्रातून मागविण्यात आलेली माहिती
पीडित युतीचा  मृत्यू  झाल्यामुळे सदरील गुन्ह्यात खुनाचे कलम 302 समाविष्ट करण्यात यावे. मृत पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळण्यास करिता मनोधैर्य योजनेतील तरतुदीनुसार शासनास प्रस्ताव सादर करावा. आणि आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावेत, असे असल्याचे पत्र राज्य महिला आयोगातर्फे चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पाठवण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to submit chunabhatti case report