औरंगाबादमध्ये तेरा वर्षाच्या मुलाचे अवयवदान

योगेश पायघन 
शुक्रवार, 22 जून 2018

औरंगाबाद : चोवीस तासात शहरात दुसरे अवयवदान होत आहे. गुरुवारी (ता 21) बदनापूरच्या लक्ष्मण भोईटे याच्या अवयवदान व प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्यातून तिघांना जीवदान मिळाले तर गुरुवारी रात्री उशिरा 13 वर्षीय अपघात ग्रस्त मुलाचे अवयवदान प्रक्रिया एमजीएममध्ये शुक्रवारी (ता.22) सकाळपासून सुरू झाली असून या अवयवदानामुळे पाच जनांना जीवदान मिळणार आहे.

हृदय, फुफ्फुस मुंबई तर  यकृत नागपूर येथे चार्टर्ड फ्लाईटने नेण्यात येणार आहे. तर दोन किडन्याचे शहरातच प्रत्यारोपण होणार आहे. एक किडनी एमजीएम तर दुसरी किडनी बजाज हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचे एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले. तर झेडटीसीसीचे समन्वयक हे कागदोपत्री परवानग्या मिळवण्यात व्यस्त आहेत. पोलीस ना हरकत मिळाल्यानंतर साडे नऊ वाजेपर्यंत रीट्रायव्हल सुरू होण्याची शक्यता आहे असे गाडेकर म्हणाले तर दुपारी चार वाजेपर्यत अवयव मुंबई नागपूर ला रवाना होतील असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

अवयवदानाने पाच जणांना जीवदान -
-चोवीस तासात दुसरे अवयवदान
-आठ जणांना जीवदान
-एमजीएम रुग्णालयात प्रक्रिया सुरू
-नागपूर, मुंबईला जाणार अवयव
-चार्टर्ड फ्लाईटचे नियोजन, पोलिसही लागले कामाला

Web Title: organ donation of 13 years old boy