जातीय सलोखा राखण्यासाठी फुटबॉल सामन्यांचे आयोजन

मनोज साखरे
बुधवार, 20 जून 2018

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील जातीय सलोखा राखून तो वृद्धिंगत करण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने बुधवारी (ता. 20) दुपारी दोन ते पाच या वेळेत पोलिस आयुक्तालयातील देवगिरी मैदानात होणार आहेत.

औरंगाबादेत गत महिन्यात अकरा व बारा मे रोजी दंगल घडली. यात कोट्यवधींचे नुकसान आणि दोन जीव गेले. शहरात झालेल्या दंगलीच्या जखमा भरून काढण्यासाठी पोलिस प्रशासन विविध उपाय राबवत आहेत. इफ्तार पार्टी व राष्ट्रीय सामाजिक सलोखा अभियानाद्वारे पोलिसांनी शांतता आणि सोहार्दतेसाठी प्रयत्न केलेत. आता फुटबॉल वर्ल्डकप सुरु आहे, या निमिताने अशाच सामन्याचे आयोजन करून एकता व सद्भावनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमात फुटबॉलचे एकूण पाच सामने होणार आहेत. आरंभी पोलिस आणि महापालिका यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. त्यानंतर चार सामने होतील. 

वेगवेगळ्या समाजातील तरुणांमध्ये हे सामने होतील. सामन्यांची सुरुवात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद,  महापालिका आयुक्त विनायक निपुण, सिडको प्रशासक ओमप्रकाश बकोरिया व पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांच्या  हस्ते होणार आहे. खेळाडूंना खेळाप्रती प्रोत्साहन देण्यासाठी टी शर्ट व फुटबॉलचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: organised football match for keep condition stable