
जिल्ह्यामध्ये रविवारी 21 नवीन रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यु झाला आहे. दिवसभरामध्ये 36 बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 14 हजार 854 बाधित रुग्ण बरे झालेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के एवढे झाले आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी 21 नवीन रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यु झाला आहे. दिवसभरामध्ये 36 बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 14 हजार 854 बाधित रुग्ण बरे झालेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के एवढे झाले आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्ह्यातील मृत्यूदर 3.62 टक्के एवढा आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा बावी येथील 65 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. परंडा तालुक्यातील देऊळगाव येथील 60 वर्षीय पुरुषाचा बार्शी यथील खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आजपर्यंत 97 हजार 254 इतक्या संशयिताची तपासणी करण्यात आली असुन त्यातील 15 हजार 727 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 109 संशयिताचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील 13 जणांना कोरोनाची लागन झाली असुन 257 जणांची अँटिजेन टेस्ट केली होती. त्यातील नऊ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. अशा 21 रुग्णांना कोरोनाची लागन झाली असुन उस्मानाबाद तीन, तुळजापुर दोन, उमरगा दोन, कळंब तीन, भुम सहा, परंडा तीन तर वाशीमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
उस्मानाबाद कोरोना मीटर
(संपादन-प्रताप अवचार)