esakal | Corona Update : उस्मानाबादेत आज १३० जण पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

जिल्ह्यामध्ये  आज १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तर दोघांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता २ हजार ३० वर गेली आहे. सध्या एक हजार ३१५ रुग्णावर उपचार सूरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

Corona Update : उस्मानाबादेत आज १३० जण पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये  आज १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तर दोघांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता २ हजार ३० वर गेली आहे. सध्या एक हजार ३१५ रुग्णावर उपचार सूरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
 
जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र येथे एकुण ३५५ स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. त्यातील ३७ अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश 

या भागातील रुग्णांचा समावेश  
तुळजापुर तालुक्यातील ४८, कळंब २८, उमरगा २७ व उस्मानाबाद १८ रुग्णांचा समावेश आहे. या सोबतच परंडा तालुक्यातील सात तसेच लोहारा व वाशी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. उस्मानाबाद शहरामध्ये बँक कॉलनी एक, जिल्हा रुग्णालय एक, देवी मंदीर परिसर एक, समता नगर पाच, भुमि अभिलेख कार्यालय तीन, खाजा नगर एक, विधाते हास्पीटल एक, तर तालुक्यातील तेर एक, चिंचपुर एक, सकनेवाडी एक, बोरगाव एक येथील रुग्णांचा समावेश आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

तुळजापुर येथील हडको परिसर चार, उपजिल्हा रुग्णालय दोन, राऊळ गल्ली एक,कणे गल्ली दोन,तुळजाई नगर पाच तर तालुक्यामध्ये अणदुर सात, नळदुर्ग दोन, देवसिंगा दोन, चिवरी एक, बारुळ एक, दहिटणा एक, काटी एक, मसला एक, कसाई सात, जळकोट दोन, पाशा नगर नळदुर्ग एक, तीर्थ एक आदी भागामध्ये रुग्ण सापडले आहेत. उमरगा येथे पतंगे रोड सहा, बालाजी नगर नऊ तर तालुक्यामध्ये मुरुम सहा, नाईचाकुर एक, जेकेकुर एक, गुंजोटी एक, तुरोरी एक व माडज दोन या भागामध्ये रुग्णसंख्या आढळली आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

कळंब तालुक्यामध्ये रत्नापुर १७, मस्ता सहा, दहिफळ एक, इटकुर एक, येरमाळा एक, भाटशिरपुरा एक आदी भागामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. परंडा येथील शेलगाव एक, शिरसाव तीन, वाडकी एक व शहरामध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. लोहाऱ्यात व वाशी प्रत्येक एक रुग्ण सापडला आहे. 

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

मृत्यूमध्ये कळंब शहरातील दत्त नगर भागातील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच उस्मानाबाद तालुक्यातील  सारोळा (बु) येथील एका ४५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे. त्यामुळे मृत्युची संख्या आता ६३ इतकी झाली आहे.

संपादन-प्रताप अवचार

loading image