Corona-virus : उस्मानाबादेत आज प्रथमच सर्वाधिक पॉझिटिव्ह; एकूण बाधितांची संख्या गेली ७२८ वर

सयाजी शेळके
Tuesday, 28 July 2020

कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. बाधित रुग्णांचा आलेख वाढत असल्याने जिल्ह्याची चिंताही वाढली आहे. त्यात बाधित होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने प्रशासनासाठी ही एक मोठं आव्हान उभे राहिले आहे. सोमवारी (ता. २७) एका दिवसात तब्बल सर्वाधिक आत्तापर्यंत ७५ रुग्णांची भर पडली.

उस्मानाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) एका दिवसात तब्बल ७५ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांच्या आकडा  ७२८ वर पोहोचला आहे. औरंगाबाद येथून रात्री उशिरा १७८ रुग्णांपैकी तब्बल ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तर ४६५ रुग्ण बरी होऊन घरी परतली आहेत.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. बाधित रुग्णांचा आलेख वाढत असल्याने जिल्ह्याची चिंताही वाढली आहे. त्यात बाधित होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने प्रशासनासाठी ही एक मोठं आव्हान उभे राहिले आहे. सोमवारी (ता. २७) एका दिवसात तब्बल सर्वाधिक आत्तापर्यंत ७५ रुग्णांची भर पडली.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

सकाळच्या सत्रात आंबेजोगाई येथून आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर उस्मानाबाद येथून चौदा रुग्णांचे अहवाल आल्यानंतर त्यामध्ये दोन पॉझिटिव आढळून आले. तर रात्री उशिरा उस्मानाबाद येथील प्रयोगशाळेतून ९६ अहवाल आले. यामध्ये २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रात्री उशिरा पुन्हा औरंगाबाद येथून  १७८ रुग्णांचे अहवाल मिळाले.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

यामध्ये तब्बल ४५ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे दिसून आले.  त्यामुळे एकाच दिवसात तब्बल ७५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. आत्तापर्यंत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण बाधित होण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता एकूण बाधित रुग्णांचा आकडा ७२८ वर पोहोचला आहे. यात जमेची एक बाब म्हणजे अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले असून अशा रुग्णांची संख्या ४६५ वर गेली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

तर कोरोणाने बळी पडलेल्यांची संख्या ही ३९ वर पोहोचलेली आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडाही मोठा असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनासमोर हे एक मोठं आव्हान असणार आहे. यापूर्वीही आरोग्यमंत्र्यांनी मृत्यूदर कमी करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्याचा मृत्यूदर वाढत असल्याचे चित्र आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad Corona Update today 75 new corona patient