esakal | Coronavirus : उस्मानाबाद जिल्हातील हा तालुका झाला कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona image.jpg

कळंब तालुक्यात एकूण ३२ जनांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आता संपूर्ण तालुक्यातील  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी विविध खबरदारी घेतली. त्यामुळे कळंब तालुका कोरोनामुक्त झाला आहे. 

Coronavirus : उस्मानाबाद जिल्हातील हा तालुका झाला कोरोनामुक्त

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) : प्रत्येक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मृत्यू संख्या देखील वाढत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे  उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका कोरोनामुक्त झाला आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

कळंब तालुक्यात एकूण ३२ जनांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आता संपूर्ण तालुक्यातील  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी विविध खबरदारी घेतली. त्यामुळे कळंब तालुका कोरोनामुक्त झाला आहे. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
तालुक्यातील पाथर्डी येथून कोरोनाची एन्ट्री झाली होती. त्यानंतर हावरगाव शहर, शिराढोन व हासेगाव या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट ठरल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तालुक्यात कोरोना बाधित ३६ रुग्ण संख्या झाली होती. यात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढू नये म्हणून महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाच्या पथकाने परिश्रम घेतल्याने सध्या कळंब तालुका कोरोनामुक्त झाले आहे.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

जिल्हाभर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. एप्रिल महिन्याच्या शेवटी तालुक्यातील पाथर्डी येथील दांपत्य पुणे येथून गावात आले होते. हॉटस्पॉट भागातून आलेल्यांची आरोग्य विभागाने तपासणी करून त्यांना शेतात क्वारंटाईन केले होते. तपासणीत हे दांपत्य पॉझिटिव्ह आढळून आले तेथूनच तालुक्याच्या दप्तरी कोरोना रुग्णाची नोंद झाली. परिणामी प्रशासनामोर आव्हान वाढले.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

कोरोनाचा संसर्ग तालुक्यात वाढू नये म्हणून आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. लागलीच तालुक्यातील हावरगाव, भाटशीरपुरा व शहरातील एका रुग्णाची भर पडली. रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन हतबल झाले आहे. प्रशासनाच्या खबरदारीमुळे पहिल्या टप्प्यातील पाथर्डी, हावरगाव, शहरातील रुग्ण कोरोना मुक्त झाले. शिराढोन व शहरातील मुंबई कनेक्शनमूळे रुग्ण संख्या पुन्हा वाढली. एकाच दिवशी पॉझिटिव्ह ची संख्या मोठी वाढल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

याशिवाय आंदोरा येथे रुग्ण आढळून आले व त्यांच्या संपर्कातील हासेगाव येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने मोठे कष्ट घेत संपर्कातील सर्वांचे स्वब नमुने घेत तपासणीसाठी पाठविले.  सर्व निगेटिव्ह आले. तालुक्यातील शिराढोन येथे मे महिण्याच्या शेवटी शेवटी पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने महसूल प्रशासन, पोलीस, आरोग्य प्रशासनाने योग्य खबरदारी घेत कोरोना विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळे कळंब तालुका सोमवार (ता.१५) कोरोनामुक्त झाले आहे. आरोग्य प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन जनजागृती केली. या परिसरात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. महसूल प्रशासनाने या सर्वांवर लक्ष ठेवून कळंब तालुका कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने पाऊले उचलली होती.

सर्वांच्या सक्रिय पुढाकारामुळे शक्य 

तालूक्यातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सुरवातीपासूनच आरोग्य, महसूल,पोलीस प्रशासन सतर्क होते. कळंब शहरावर सर्व प्रशासनाची करडी नजर होती. ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यामुळे कळंब तालुका आता कोरोनामुक्त झाला  आहे.

डॉ . जीवन वायदंडे , उपजिल्हा रुग्णालय, वेधकीय अधीक्षक 

loading image