उस्मानाबाद : कोरोना टेस्टिंग लॅब कार्यान्वित, पहिल्याच दिवशी २०६ स्वॅबची तपासणी, वाचा किती जण आले पॉझिटिव्ह

तानाजी जाधवर
Saturday, 25 July 2020

राज्यातली दुसरी नॉन मेडीको आरटीपीसीआर लॅब उस्मानाबादेत उभा राहीली आहे. पहिल्या दिवशी २०६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. वाशी तालुकातल्या दोघांचा तर कळंब तालुकातल्या एकाचा समावेश आहे. 

उस्मानाबाद : विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना टेस्टिंग लॅब यशस्वीरीत्या सुरु झाली आहे. राज्यातली दुसरी नॉन मेडीको आरटीपीसीआर लॅब उस्मानाबादेत उभा राहीली आहे. पहिल्या दिवशी २०६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. वाशी तालुकातल्या दोघांचा तर कळंब तालुकातल्या एकाचा समावेश आहे. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर कडून मान्यता दिल्यानंतर (ता.२३) रोजी या लॅबचे ॲनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. लोक सहभागातून उभा राहिलेल्या उस्मानाबादच्या लॅबला मान्यता मिळाल्याने  टेस्टिंगची संख्या वाढणार आहे. शिवाय लवकरात लवकर त्याचे अहवाल देखील प्राप्त होऊ शकणार आहेत. (ता.२४) पासून चाचण्या सूरू करण्यात आल्या त्याचा अहवालही रात्री उशीरा प्राप्त झाले आहेत. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

या लॅबसाठी एक कोटी २० लाखांचा निधी लोकांनी जमा करून लॅब उभारली आहे. यामध्ये दररोज ६०० तपासण्या होवू शकतात मात्र सुरुवातीला किमान ४०० तपासण्या अपेक्षित आहेत. पण पहिल्या दिवशी २०६ तपासण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये वाढलेला असल्याने त्याचा धोका पाहता स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढल्याचे दिसुन येत आहे. पण त्या तुलनेत त्याचे अहवाल लवकर मिळत नव्हते. सुरुवातीला मुंबई तर मध्यंतरी हे अहवाल सोलापुरातुन येत होते. त्यानंतर लातुर पुन्हा सोलापुर असा प्रवास झाला आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

आता अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविलयात तपासणी अहवाल पाठविण्यात येत होते. लवकर अहवाल येतील अशी अपेक्षा होती मात्र त्याला अधिक वेळ लागत असल्याचे दिसुन येत आहे. त्यावर येथील विद्यापीठ उपकेंद्रातील मायक्रोबॉयलॉजीच्या विभागामध्ये त्याची तपासणी करता येणे शक्य असल्याचे तज्ञाचे म्हणणे होते. त्यासाठी सोसीसुविधासाठी खर्च अपेक्षित होता. त्याची उपलब्धता झाल्याने व सर्व परवानग्या मिळाल्याने हे अहवाल शहरातच तपासले जाऊन लागणारा वेळही वाचु शकणार आहे. शिवाय ही यंत्रणा कायमस्वरुपी जिल्ह्यासाठी उपयोगाची ठरु शकणार आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

राज्यामध्ये कोरोना विषाणुच्या माध्यमातुन आरोग्य विभागावर सध्या मोठा ताण वाढल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये इतरही सहाय्यभुत ठरणाऱ्या घटकांनी यामध्ये सहभागी होऊन त्याना मदत करण्याची तयारी देखील दर्शविली आहे. त्यासाठी काही निधीची गरज असली तरी त्याचा विनियोग अत्यंत चांगला ठरु शकतील अशा बऱ्याच बाबी समोर आल्या आहेत. त्यातील महत्वाचा घटक म्हणजे विद्यापीठ उपकेंद्रातील मायक्रोबॉयोलॉजी विभाग. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम  

या विभागामध्ये एमएस्सी करणारे विद्यार्थी तसेच तज्ञ प्राध्यापक असल्याने नव्याने मनुष्यबळाचीही आवश्यकता भासणार नाही. जिल्ह्यासाठीसुध्दा ही सुविधा अत्यंत कमी कालावधीमध्ये निर्माण होऊ शकत होती मात्र  काही तांत्रीक बाबीची पुर्तता व निधीची उपलब्धता होण्यासाठी विलंब झाला होता, अखेर त्याला मान्यता  मिळाली आहे. पहिल्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्याने लॅबचा यशस्वी प्रयोग देखील झाला आहे.

(edited - pratap awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabd corona test lab start first day 206 swab test and three swab is positive