Corona-Virus : उस्मानाबाद जिल्ह्यात आज १०५ पॉझिटिव्ह; चार बाधितांचा मृत्यू 

corona.jpg
corona.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे आज आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आतापर्यंत सर्वाधिक आल्याने चिंतेत भर पडली आहे. १०५ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अजुनही ११७ लोकांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण उमरगा येथे सापडले असुन एकट्या उमरगा तालुक्यात ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालय येथुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथे एकुण ३८७ स्वॅब नमुणे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ३८, उमरगा ४७, तुळजापुर पाच, कळंब पाच, परंडा तीन व वाशी सात असे एकुण १०५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

उस्मानाबाद शहरातील आगड गल्ली तीन, खाजानगर १४, महाराष्ट्र बँकेजवळ १० व सांजा रोड येथील एक जण अशा २८ जणांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यातील गावसुद येथील चार जण, येवतीमध्ये तीन, येडशी व रुईभर येथे प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आला आहे.

उमरगा येथे आरोग्यनगर, शिवाजी चौक, भाजी मार्केट, पतंगे रोड, महात्मा फुले नगर, सानेगूरुजी नगर, अजय नगर, सोनार गल्ली, राम नगर, पटेल स्विट मार्ट, इंदीराचौक, एकोंडी रोड, गॅस एंजन्सी जवळील भाग, नगर परिषदेसमोरील परिसर, बालाजी नगर, शिवपुरी, सदन नगर, जुनी पेठ आदी शहरातील भागात रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे निम्याहुन अधिक शहरात कंटेन्मेंट झोन राहणार आहे. या शिवाय उमरगा तालुक्यातील दाबका, मुळज, कंटेकुर, मूरुम, तुरोरी आदी गावामध्येही रुग्णांची अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

तुळजापुर येथील अजिंक्य रेसी़डेन्सी, उपजिल्हा रुग्णालय, अणदुर, नळदुर्ग व बारुळ येथे रुग्ण बाधित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कळंब शहरातील शिवाजी नगर, सोनार गल्ली यासह डिकसळ, मंगरुळ येथे रुग्ण सापडले आहेत. परंडा येथील वाघेगव्हाण येथील दोन व उपळा येथील एक रुग्णांची पॉझिटिव्ह मध्ये समावेश आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील पाच व नंदगाव दोन जण अशा सात जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मृत्यूमध्ये येथील रुग्णांचा समावेश 

मृत्यूमध्ये येडशी येथील ६० वर्षीय वृध्द, सांजा रोड येथील ५८ वर्षाचे गृहस्थ, कंटेकुर येथील एकाचा आणि कळंब तालुक्यातील सोनार गल्ली येथील ५८ वर्षाच्या गृहस्थाचा समावेश आहे.

Edited by pratap Awachar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com