बस सुसाट, विद्यार्थी थांब्यावरच

आनंद खर्डेकर
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- बसथांब्यावरच रात्री उशिरापर्यंत ताटकळत 
- मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 
- काही बस थांबत नसल्याने गैरसोय 

परंडा (जि. उस्मानाबाद) ः बस थांबत नसल्याने रात्री उशिरापर्यंत विद्यार्थिनींना बसथांब्यावरच थांबावे लागल्याचा प्रकार सोमवारी (ता. 25) घडला. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

बस थांबत नसल्याने गैरसोय
तालुक्‍यात अनेक विद्यार्थी ग्रामीण भागामधून शहरांमध्ये शिक्षणासाठी येतात; परंतु काही बसगाड्या विनंती करूनही थांबत नाहीत. गाडीत जागा असतानाही काही चालक थांबत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करीत आहेत. शासनाने मुलींसाठी मोफत पास योजना सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या अनेक मुली शिक्षणासाठी शहरात येऊ लागल्या आहेत. पास काढल्यामुळे त्यांना बस प्रवासच करावा लागतो; मात्र काही बस थांबतच नसल्याने त्यांचीही गैरसोय होते. सोमवारी (ता.25) शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी अनेक विद्यार्थी येथील शिवाजी चौकात रात्री उशिरापर्यंत थांबून होते. यात विद्यार्थिनीदेखील होत्या. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली अन या गावात झाली मारामारी

राज्यात 1.89 लाख पदे रिक्त, मेगाभरतीचा केवळ गवगवा

विद्यार्थी-विद्यार्थिनींना थांबावे लागल्याचा प्रकार
ग्रामीण भागात अजूनही मुलींच्या शिक्षणाबाबत फारशी उत्सुकता नाही. सततच्या जागृतीमुळे आता हे चित्र काहीसे बदलत आहे. मुली शहरात शिक्षणासाठी येत आहेत. दुपारी साडेचारला शाळा सुटल्यानंतर पाचच्या सुमारास गावाकडे जाण्यासाठी बस असणे गरजेचे आहे. बस थांबत नसल्याने रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना थांब्यावर थांबावे लागल्याचा प्रकार आज घडला.

आमच्या शाळेतील काही शिक्षकही उशिरापर्यंत बसथाब्यांवर होते. विद्यार्थ्यांना गावाकडे पाठविल्यानंतर ते घरी गेले. शाळा सुटल्यानंतर बसची सोय असावी, त्याबरोबरच बस थांबणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा येथील बावची विद्यालयाचे शिक्षक नारायण खैरे यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad- bus did not stop