BIG NEWS : उस्मानाबाद जिल्ह्यात आता प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू 

deepa mudhol munde.jpg
deepa mudhol munde.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यात तुर्तास लॉकडाऊन होणार नसले तरी जमावबंदी लागू केली असून प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू लागू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंढे यांनी दिली आहे.

शिवाय ग्रामीण भागात दंडात्मक कारवाईवर भर दिला जाणार असून त्यासंबधीच्या सुचना दिल्या असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत शुक्रवारी (ता. तीन) त्या बोलत होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. संजय कोलते, अतिरीक्त जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आर. व्ही. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे म्हणाल्या की, सध्या कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. जिल्ह्यातही प्रमाण वाढत आहे. शिवाय ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्या लॉकडाऊन केले जाणार नाही. मात्र पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

ग्रामीण भागात कारवाईवर भर
सध्या ग्रामीण भागात मास्कचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय दुचाकीवर दोघेजण फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबात कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दंडात्मक कारवाई करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

क्वारंटाईन करणार
शेजारी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत. काही नागरिक रुग्णसेवेच्या निमित्ताने शेजारील जिल्ह्यात जातात. त्यांच्यासोबत कुटुंबातील काही व्यक्ती असतात. अशांना कोरोनाची बाधा होते. मात्र कुटुंबातील सोबत गेलेला व्यक्ती घरी थांबत नाही. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईन केले जाणार आहे.

कोरना संसर्गाने बी. पी, शुगर, कॅन्सर, असे आजार असणारे नागरिक बळी पडत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील अशा नागरिकांचा सर्वे करण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच त्यांची माहिती मिळून त्यांना तेथेच सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही मुधोळ-मुढे यांनी यावेळी सांगितले. पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनीही यावेळी त्यांच्या कामाची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com