सीएस साहेब ! तुम्हाला, तुमच्याच हॉस्पिटलवर 'भरोसा' नाही का?

Osamanabad district Hospital.jpg
Osamanabad district Hospital.jpg

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रमुख असलेले जिल्हा शल्यचिकित्सकांनाच संसर्ग झाल्यानंतर त्यांनी उपचारासाठी शहरातील खासगी दवाखान्यावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सामाजिक स्तरातून टीका होऊ लागली आहे. 

कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारी यंत्रणा अत्यंत कसोशीने कामाला लागले आहेत. लोकांना या सेवेबद्दल विश्वास निर्माण होण्यासाठी अनेक प्रयत्न होऊ लागले आहेत. ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी प्रशासन जीवाचे रान करीत आहेत. परंतू या यंत्रणेच्या प्रमुखाला कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांनी उपचारासाठी निवडलेल्या हॉस्पिटलमुळे संपुर्ण यंत्रणा टिकेचा धनी झाली आहे. 

शासकीय रुग्णालयासारखी सर्व सोयीसुविधायुक्त संस्था त्या संस्थेचा डोलारा डोक्यावर घेऊन चालणारा व्यक्तीवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. या व्यक्तीने आपल्या एखाद्या कृतीचा संपुर्ण यंत्रणेवर सुध्दा किती दुरगामी परिणाम होऊ शकतात याचा विचार करणे आवश्यक असते. दोन दिवसापुर्वी जिल्हा शल्यचिकित्सक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा अहवाल आल्यानंतर त्यांनी येथील खाजगी रुग्णालयात उपचाराची सोय करुन घेतली. अशावेळी जिल्हा रुग्णालयाच्या एवढ्या मोठ्या यंत्रणेवर त्यांचा अविश्वास असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुढील काळात सरकारी दवाखान्यात येण्यासाठी कोणत्या हक्काने तुम्ही सामान्य माणसाना आवाहन करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे? 

एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेतल्याबद्दल तक्रार नव्हतीच हा व्यक्तीगत प्रश्न आहे, हे जरी मान्य केले तरी तुम्ही एका जबाबदार पदावर असल्याने निश्चितपणे त्याचा थेट परिणाम संस्थेवर होणार आहे. आरोग्य यंत्रणेचा सामान्य स्टाफचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिवाय सरकारी रुग्णालये ही फक्त गरीबासाठीच असतात हा समज दुर करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणे अपेक्षित होते. या प्रकरणामुळे उस्मानाबादेत ते टीकेचे धनी झाले आहेत.  

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com