शहराच्या हद्दीतील शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचीत

तानाजी जाधवर
शुक्रवार, 13 जुलै 2018

उस्मानाबाद: सध्या पंतप्रधान पिक विमा भरण्याची प्रक्रीया सूरु आहे. ही प्रक्रीया यावर्षी ऑनलाईन केली असून त्याच्या माध्यमातून अनेक अडचणी येत आहे. शहराच्या हद्दीत असलेल्या शेतीचा पिक विमा काढता येत नसल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद: सध्या पंतप्रधान पिक विमा भरण्याची प्रक्रीया सूरु आहे. ही प्रक्रीया यावर्षी ऑनलाईन केली असून त्याच्या माध्यमातून अनेक अडचणी येत आहे. शहराच्या हद्दीत असलेल्या शेतीचा पिक विमा काढता येत नसल्याचे दिसून येत आहे.

ऑनलाईन विमा भरण्याचे काम pmfby.gov.in या वेबसाईटवर सूरु आहे. यामध्ये पिक विमा भरताना सूरुवातीला जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर ग्रामपंचायत व शेवटी गाव असे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. हे पर्यायानुसार ग्रामीण भागातील गावांचा पिक विमा भरता येत असला तरी यामध्ये तांत्रिक दोष झाल्याने शहरालगत ज्यांच्या शेती आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र यामध्ये भाग घेता येत नसल्याचे चित्र आहे. उस्मानाबादच्या हद्दीत हजारो हेक्टर क्षेत्र शेतीखाली असून त्यांच्या पिकविम्याच्या पर्यायामध्ये उस्मानाबाद गावच येत नसल्याने त्यांचा पिकविमा भरताच येत नसल्याचे समोर आले आहे. अशा शेतकऱ्यांनी पिक विम्यापासून वंचित राहयचे का? असा सवाल उपस्थित होत आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील चार शहराच्या बाबतीत आल्याचे दिसून येत आहे. उमरगा, भुम व परंडा येथील शहरालगत शेतकऱ्यांना असा पिकविमा भरता येत नसल्याने पिक विम्यापासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर येणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी कंपनीकडे विचारणा केली असता, ही वेबसाईट शासनाची असून त्याबद्दल शासनाचे अधिकारीच बोलु शकतील असे सांगितले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नेमकी दाद मागायची कोणाकडे असा तिडा निर्माण झाला आहे. एका बाजुला शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवु नका अधिकाधिक जागृती करा, अशा प्रकारचे आदेश राज्या शासनाच्या कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे त्यांच्याच वेबसाईटमध्ये तांत्रीक अडचणीचा मोठा फटका हजारो शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

शहराच्या हद्दीमध्ये आमची शेती असून त्याचा पिक विमा भरण्याचा प्रयत्न केला मात्र ऑनलाईन प्रक्रीयेमध्ये उस्मानाबाद शहराचे नाव गावामध्ये येत नसल्याने तो भरता येत नाही. विमा कंपनीकडे विचारणा केली मात्र शासनाची वेबसाईट असून त्याबाबत आम्ही काही करु शकत नसल्याचे त्यानी सांगितले.

Web Title: osmanabad farmer agriculture Insurance issue