अंतिम अहवाल निगेटिव्ह, तिन्ही रुग्णांना डिस्चार्ज

उमरगा : कोरोनाबाधित तिन्ही रुग्णांचे अंतिम अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याच्या कार्यक्रमावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करताना ज्ञानराज चौगुले, विठ्ठल उदमले. या वेळी प्रा. सुरेश बिराजदार, कैलास शिंदे, अनुराधा उदमले आदी.
उमरगा : कोरोनाबाधित तिन्ही रुग्णांचे अंतिम अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याच्या कार्यक्रमावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करताना ज्ञानराज चौगुले, विठ्ठल उदमले. या वेळी प्रा. सुरेश बिराजदार, कैलास शिंदे, अनुराधा उदमले आदी.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या तिन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे अंतिम अहवाल रविवारी (ता. २०) सकाळी निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधीच्या सामुहिक प्रयत्नातून जिल्हा कोरोनामुक्त झाल्याची आनंदाची बातमी असल्याने आता उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये येईल.

दरम्यान, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास तिन्ही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना आरोग्य, महसूल व पोलिस प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात रुग्णांचा सत्कार केला.

उमरगा तालुक्यातील दोन व लोहारा तालुक्यातील एका कोरोना बाधित रुग्णांवर गेल्या अठरा दिवसांपासून उपचार सुरू होते. नियमित औषधोपचारामुळे त्यांची प्रकृतीही स्थिर झाली. त्या तिघांचे स्वॅब दुसऱ्या चाचणीतही निगेटिव्ह आल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा दिसत होत्या. आरोग्य विभागाने मोठ्या जोखीमेतून केलेल्या प्रयत्नालाही यश मिळाले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडीत पुरी, डॉ. वसंत बाबरे, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. बसवराज दानाई, डॉ. विनोद जाधव, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अखिलेश नारलावार, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. विनोद जाधव, डॉ. कोमल गरड, डॉ. वैशाली चाकोते, डॉ. सुनंदा सुर्यवंशी, डॉ. रमेश थोरात, डॉ. राजेश सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके यांच्यासह सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी गेल्या अठरा दिवसांपासून जोखीमेतून वैद्यकिय सेवा केली. तसेच महसूल व पोलिस यंत्रणेने चांगले काम केल्याने या सर्वांचा आमदार चौगुले, श्री. शिंदे, श्री. गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

टाळ्यांच्या गजरात झाले रुग्णांचे स्वागत 
गेल्या १८ दिवसांपासून उपचार घेऊन रोगमुक्त झालेल्या त्या तिघांना रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. घराकडे परतताना आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष कैलास शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, डॉ. बाबरे, डॉ. उदय मोरे, डॉ. दीपक पोफळे, पत्रकार राजेंद्र हुंजे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, नगरसेवक संजय पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, ख्वाजा मुजावर, जाहेद मुल्ला यांच्यासह परिचारिका, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन टाळ्याच्या गजरात त्या रुग्णांचे स्वागत केले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ, पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान, या वेळी डॉ. पुरी यांनी कोरोनाच्या संघर्षात सर्व शासकीय यंत्रणेचे सहभाग लाभल्याचे मनोगत व्यक्त केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, महसूल, पोलिस यंत्रणा, आरोग्य व पालिका विभागाने मोलाचे सहकार्य केल्याने तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. बाधित रुग्णांवरील उपचारासाठी आरोग्य विभागाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. कोरोनाशी लढाई अजून संपलेली नाही. यापुढील काळातही सर्वांनी सतर्कता पाळणे गरजेचे आहे. 
- ज्ञानराज चौगुले, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com