esakal | सोशल डिस्टन्ससाठी असाही फॉर्मुला

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद : दोन ग्राहकामध्ये किमान तीन ते पाच फूट अंतर राहण्यासाठी शहरातील अनेक दुकानांसमोर चुन्याने केलेल्या खूणा.

प्रत्येकापासून किमान तीन ते पाच फूट अंतरावर राहावे, अशी रचना दुकानासमोर करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सीगचा नियम पाळला जात असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सोशल डिस्टन्ससाठी असाही फॉर्मुला
sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सचा प्रयोग शहरात राबविला जात आहे. शहरातील किराणा आणि भाजीपाला दुकानासमोर एकमेकात पाच फूट अंतर ठेउन उभे राहण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी ही स्वतः या नियमाचे पालन करीत बुधवारी (ता. २५) भाजीपाला खरेदी केला. 

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. समाजात या विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी आवश्‍यक काळजी घेतली जात आहे. प्रत्येकाने एकमेकांपासून तीन मीटर अंतरावर थांबण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संचारबंदी लागू केल्याने नागरिक किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. पुन्हा भाजीपाला, किराणा मिळेल की नाही, या भितीने काही नागरिक गर्दी करीत आहेत.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

अशा ठिकाणी गर्दी करून नागरिक सोशल डिस्टन्सचा नियम मोडत असल्याचे दिसून येत आहे. यातून या विषाणूचा फैलाव होण्यास मदत मिळू शकते. त्यासाठी शहरातील काही भागात सध्या प्रत्येक किराणा दुकान, तसेच भाजीपाला दुकानासमोर सोशल डिस्टन्ससाठी चुन्याने खुणा करण्यात आल्या आहेत. ग्राहकांनी खुणा केलेल्या जागेवर उभे राहून खरेदी करावयाची आहे.

वाचा :  कोरोनामुक्तीच्या संकल्पाने लातूरात नववर्षाचे स्वागत, घरोघरी उभारली गुढी

एखादा ग्राहक दुकानावर आल्यानंतर दुसऱ्यापासून किमान तीन ते पाच फूट अंतरावर राहण्यासाठी काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा नियम पाळला जात आहे. यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील समतानगर, रामनगर परिसरात अनेक दुकानदारांनी अशा पद्धतीने भाजीपाला, तसेच किराणा विक्री सुरू ठेवली आहे. या प्रभागातील नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी सर्वच दुकानदारांना प्रोत्साहित करीत स्वत: पुढाकार घेऊन हे काम केले आहे.

पोलिसांनीही घेतली खबरदारी 
सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. ज्यांना किराणा तसेच भाजीपाला खरेदी करायचा आहे, अशा नागरिकांनी दुकानदाराने ठरवून दिलेल्या अंतरावरच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. स्वतः नियम पाळल्यानंतर त्याची अंमलबाजवणी करताना सोपे जाते. हा नियम पाळत पोलिस उपअधीक्षक राठोड तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २५) दुकानदाराने आखलेल्या चौकटीत उभे राहून भाजीपाला खरेदी केला.