esakal | OSMANABAD BREAKING : पालकमंत्री गडाख यांच्या पत्नीला कोरोना, तर ते झाले क्वारंटाईन..! 
sakal

बोलून बातमी शोधा

gadakh fb.jpg

जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती स्वतः श्री. गडाख यानी फेसबूकच्या माध्यमातुन दिली. त्यांचीही तपासणी करुन स्वॅब नमुना घेतला आहे.

OSMANABAD BREAKING : पालकमंत्री गडाख यांच्या पत्नीला कोरोना, तर ते झाले क्वारंटाईन..! 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद :  जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती स्वतः श्री. गडाख यानी फेसबूकच्या माध्यमातुन दिली. त्यांचीही तपासणी करुन स्वॅब नमुना घेतला आहे. त्यांच्याही अहवालाकडे आता लक्ष लागले असून तोपर्यंत ते क्वारंटाईन राहणार असल्याचेही त्यानी म्हटले आहे. ते जिल्ह्यामध्ये सोमवारी येणार होते मात्र आता दौरा पुन्हा ढकलावा लागणार आहे. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   
गेल्या काही दिवसांपासुन पालकमंत्री श्री. गडाख यांच्यावर जिल्ह्यातून नाराजी व्यक्त केली जात होती.  त्यानी जिल्ह्यामध्ये येऊन यंत्रणेला कामाला लावण्याची मागणी होऊ लागली. भाजप व मनसेच्यावतीने त्यांच्याविरोधात चांगलेच वातावरण तयार करण्यात आले होते. साहजिकच त्यावर त्यानी उत्तर देऊन आरोप फेटाळले होते. त्यामध्ये त्यानी कोरोनाची लागण अधिक वाढु शकण्याचा धोका बोलुन दाखविला होता.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

तर आता त्यांच्या पत्नीना कोरोनाची लागन झाल्याने आता ते काही दिवस क्वारंटाईन राहणार असल्याचे त्यानी सांगितले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यांनी यावे.  या ठिकाणी बैठक घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यानी सोमवारी जिल्ह्यामध्ये येण्याबाबत नियोजन केले होते. पण आता त्यानाच क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याचे जिल्ह्यामध्ये नियोजीत केलेले कार्यक्रम व बैठकाही पुढे ढकलण्यात येणार आहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका 

सुत्राच्या माहितीनुसार त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन करण्यात येणार होते, पण त्यांच्या गैरहजेरीत आता ही लॅब सूरु करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यानी स्वतः प्रसिध्दीपत्रकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना टेस्टिंग लॅब पुढील आठवड्यात सूरु करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

जिल्हावासीयांच्या सोयीसाठी ही लॅब अत्यंत महत्वाची असुन गेल्या अनेक महिन्यापासुन त्याची प्रतिक्षा लागुन राहिली आहे. वेगवेगळ्या कारणामुळे ही लॅब सूरु होण्यास विलंब होत असल्याचे दिसुन आले आहे. आता पुन्हा त्याला विलंब होणार याची काळजी प्रशासनाच्या माध्यमातुन घेतली जाणार आहे.

(संपादन : प्रताप अवचार)