उस्मानाबाद : कोरोनाने केले पोलीस दलातील पैलवाणाला चितपट, जिल्ह्यात आठवा बळी 

Osmanabad News
Osmanabad News

उस्मानाबाद : कोरोनाच्या संसर्गाने जिल्ह्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. लिव्हर आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या कर्मचाऱ्याला त्यांच्या कुटुंबियांकडूनच कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात हा कोरोनाचा आठवा बळी आहे. अशी माहिती अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सतिश आदटराव यांनी दिली.

कोरोनाबळी ठरलेला पोलीस कर्मचारी हा पोलीस दलातील पैलवान म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे कोरोनाने पैलवान पोलिसालाच चितपट केले आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बळींची संख्या वाढत आहे. मंगळवारी (ता. २३) पहाटे पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ते परंडा येथे कार्यरत होते. याबाबवत सविस्तर वृत्त असे की, परंड्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांना लिव्हरच्या आजाराने ग्रासले होते. त्यामध्ये त्यांची किडनीही व्यवस्थित काम करीत नव्हती.

त्यामुळे त्यांना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. सुमारे १० ते १५ दिवस सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना परंडा येथे आणण्यात आले. दरम्यान सोलापूर येथे ॲडमिट असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी तसेच मुलगा सोलापूर येथे जात होते. उपचारानंतर सर्वजण सोलापूरहून परंड्याला आले. मात्र त्यातील पत्नी आणि मुलाला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्या दोघांनी परंडा उपजिल्हा रुग्णालयात जावून स्वॅब दिला. तेव्हा ते दोघेही कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. उपचारानंतर ते दोघेही कोरोनातून मुक्त झाले.

 त्यानंतर पोलिस कर्मचारी आणि त्यांचा दुसरा मुलगा यांचा स्वॅब घेण्यात आला. पुन्हा  दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. त्यातील मुलाची कोरोनातून मुक्तता झाली. मात्र पोलीस कर्मचारी यांना पुढील उपचारासाठी शुक्रवारी (ता. १२ जून) उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नऊ दिवस त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. 

सोमवारी रात्री त्यांना जास्तीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना सोलापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. मात्र मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ताडगाव (ता. कळंब) येथील ते रहिवाशी होते. त्यांनी यापूर्वी ढोकी, कळंब, वाशी आदी ठिकाणी सेवा दिली. पैलवान म्हणूनही त्यांची पोलिस दलामध्ये ओळख होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com