esakal | Break The Chain: निर्बंधाविरोधात व्यापाऱ्यांचा रोष; शुक्रवारपासून दुकाने उघडण्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

traders against lockdown

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातल्याने व्यापारी वर्गात संताप पसरला आहे

Break The Chain: निर्बंधाविरोधात व्यापाऱ्यांचा रोष; शुक्रवारपासून दुकाने उघडण्याचा इशारा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातल्याने व्यापारी वर्गात संताप पसरला आहे. आठ तारखेपर्यंतची मुदत प्रशासनाला देण्यात आली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास गुरुवारपासून (ता. आठ) दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे. 

सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या पाचशेपर्यंत पोहचू लागली आहे. सध्या तीन हजार रुग्णांपेक्षा अधिक नागरिकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंखेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने निबंध लावले आहेत. दरम्यान, प्रशासनाने घातलेल्या निर्णयामुळे सामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्गात चांगलाच रोष तयार होत आहे. व्यापाऱ्यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली असल्याचे चित्र आहे. 

MPSC Exam: कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची खासदार इम्तियाज जलील...

अधिकाऱ्यांची बौद्धिक क्षमता? 
सध्या कोरोनामुळे प्रशासनाने अजब कारभार समोर येत आहे. शहरातील बांधकामे सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, त्याला लागणारे घटक सिमेंट, स्टील, पत्रे अशा दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. बांधकामे कशी होऊ शकतात? असा प्रश्न बांधकाम मालक विचारीत आहेत. उद्योग सुरू राहावेत, यासाठी उत्पादन करण्यास परवानगी आहे. परंतु, त्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक, हार्डवेअर साहित्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. उच्च दर्जाच्या परीक्षा पास होणारे अधिकारीच असे नियम काढत आहेत. 

गतवर्षी मोठे आर्थिक नुकसान झाले. आम्हाला कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. सध्या आमची दुकाने बंद आहेत. परंतु, आम्ही गुरुवारपर्यंत प्रशासनाला मुदत दिली आहे. जर प्रशासनाने याबाबत आदेशात बदल करून दुकानांना परवानगी दिली नाही तर आम्ही दुकाने सुरू ठेवणार आहोत. 
- संजय मंत्री, अध्यक्ष व्यापारी महासंघ, उस्मानाबाद. 

(edited by- pramod sarawale) 

loading image