धक्कादायक! उस्मानाबाद शहराजवळ बिबट्याचा गूढ मृत्यू; परिसरात खळबळ

usmanabad
usmanabad

उस्मानाबाद: शहराच्या जवळच असलेल्या वनामध्ये एक बिबट्या आढळला असून तो मृत अवस्थेत सापडला आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या दुसर्‍या भागातून स्थलांतरीत झाला आहे. हा बिबट्या दोन वर्षांचा असून नर जातीचा आहे. पण यामुळे घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

शहराच्या जवळच असलेल्या वनात हा बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. याची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सध्या वन विभागाकडून सुरु आहे. पहिल्यांदाच या भागामध्ये बिबट्या आढळून आल्याने काही प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. पण सध्यातरी सापडलेला बिबट्या मृतवस्थेत आहे. आज सकाळी हा बिबट्या वनविभागाला आढळला आहे. तो नेमका या भागात आलाच कसा याची माहिती मिळालेली नसली तरी या भागात त्याचा वावर नसल्याने तो इतर भागातुनच आल्याचे सांगण्यात येत आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातल्या घाटंग्री इथे एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. आज पहाटे हे शेतकर्यांच्या लक्षात आले. पहाटे हा बिबट्या जिवंत होता. कांही वेळात त्याचा मृत्यू झाला. वन विभागाचे कर्मचारी घाटंग्री तांडा क्रमांक दोन पोंहचले आहेत. या भागांत या पुर्वी बिबट्या आढळून आलेला नव्हता. ज्वारीत पडलेला या बिबट्याला भक्ष्य न मिळाल्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com