विधानभवनावर विराट मोर्चा काढणार - आण्णासाहेब डांगे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

उस्मानाबाद - धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत आहे. सरकारने वर्षभरात आरक्षण देणार असे आश्वासन देऊन समाजाला झुलवत ठेवले आहे. आता विधानभवनावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा धनगर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांनी दिला.

शहरातील हॉटेल जत्रा येथे रविवारी (ता. चार) झालेल्या धनगर आरक्षण निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, अहिल्या महिला महासंघाच्या अध्यक्षा पुष्पाताई गुलावाडे, जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर, महासंघाचे प्रदेश सचिव चंद्रकांत बनसोडे, डॉ. गोविंद कोकाटे, महानंदा पैलवान उपस्थित होते. 

श्री. डांगे म्हणाले, की धनगर समाजाला राज्यघटनेनुसार एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन वेळकाढूपणा करीत आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही सत्तेत येताच आरक्षण देण्याची भाषा याच पक्षाच्या नेत्यांनी केली होती.

समाजाच्या जीवावर त्याचे सरकार आले सरकारने अडीच वर्षे उलटूनही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे समाजाने पूर्वीप्रमाणे पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्याची गरज निर्माण झाली असल्याचे श्री. डांगे यांनी सांगितले. 
जिल्हा परिषद सदस्या सलगर म्हणाल्या, की ज्या पद्धतीने शेतकरी संप सुरू आहे. त्याचप्रमाणे समाजाने तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे.

विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सलगर यांनी केले. डॉ. कोकाटे यांनी राजकीय पक्षाच्या अगोदर समाज महत्त्वाचा असून पक्षभेद विसरून मोर्चात समाजाने सामील व्हावे, असे सांगितले. मेळाव्याचे सूत्रसंचालन सोमनाथ लांडगे यांनी केले. 

या वेळी ॲड. मनोज डोंबाळे, संजय घोडके, प्रा. मनोज डोलारे, संदीप वाघमोडे, देवा काकडे, संजीवन खांडेकर, बिरू चौरे, गुटे, दीपक बरकडे, सुरेश हाके, प्रा. महादेव मारकड आदी उपस्थित होते.

Web Title: osmanabad marathwada news rally on vidhanbhavan