उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

उस्मानाबाद, लातूर - उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 

खामसवाडी (ता. कळंब ) येथील शेतकरी अशोक दत्तात्रेय शेळके (वय ६०) यांची एक हेक्‍टर शेती असून, पावसाअभावी सोयाबीन करपून गेले. त्यांच्यावर बॅंकेचे १८ हजार ४००, तर दोन लाख रुपयांची उसनवारी होती. ते कर्जफेडीच्या विवंचनेत होते. सोमवारी (ता. २१) रात्री ते शेतात गेले ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी आज शोध घेतला असता शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

ढोराळा (ता. कळंब) येथील शेतकरी वैजिनाथ नवनाथ चौगुले (४५) यांनी आज पहाटेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची अडीच एकर शेती असून पावसाअभावी सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके करपून गेल्याने ते कर्जफेडीच्या विवंचनेत होते, असे सांगण्यात आले. दोन्ही घटनांचा महसूल विभागाने पंचनामा केला असून, शिराढोण पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली. 

हालसी (हत्तरगा, ता. निलंगा) येथील शेतकरी भरत वसंत सूर्यवंशी (३०) यांनी आज सकाळी आठच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती विकून घेतलेल्या टेंपोची कर्जफेड शक्‍य होत नसल्याने ते विवंचनेत होते, अशी माहिती भगवान सूर्यवंशी यांनी कासारशिरसी पोलिसांना दिली. भरत सूर्यवंशींच्या मागे वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: osmanabad marathwada news three farmers suicide