उमरगेकरांना दिलासा : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील ३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह

file photo
file photo

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा व लोहारा तालुक्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील दोन गावांतील पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईकासह संपर्कात आलेल्या ३५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील २९ जणांचा अहवाल शनिवारी (ता. चार) रात्री उशीरा आला होता. तर उर्वरीत सहा जणांचा अहवाल रविवारी (ता. पाच) रात्री आठ वाजता प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार तूर्त तरी उमरगेकरांना दिलासा मिळाला आहे.

उमरगा तालुक्यातील एका भूकंपग्रस्त गावातील एका तरूणाचा अहवाल शुक्रवारी (ता. तीन) रात्री पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रशासनाने त्या गावातील रुग्णाचे नातेवाईक व त्याच्या संपर्कात आलेल्या २४ नागरिकांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्यापैकी २२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती शनिवारी रात्री मिळाली होती. तर दोघांचा अहवाल रविवारी रात्री आला तो ही निगेटिव्ह आला आहे.

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील आष्टाकासार येथील चार जणांचा अहवाल शनिवारी रात्री निगेटिव्ह आला होता. तर धानुरी गावातील चारपैकी दोघांचा अहवाला शनिवारी रात्री मिळाला. तर उर्वरीत दोघांचा अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाला असून, ते ही निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

तर येणेगूर येथील दोघांचे अहवाल ही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता शहरातील एका पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकाच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com