उमरग्यातील चौदा सहकारी सेवा संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु | Osmanabad News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 election
उमरग्यातील चौदा सहकारी सेवा संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु

उमरग्यातील चौदा सहकारी सेवा संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुका प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहेत. पहिल्या टप्प्यात संस्थेवर प्रशासक असलेल्या चौदा गावांच्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तालुक्यातील (Umarga) मुळज संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारपासुन (ता.१७) सुरू झाला असून २६ डिसेंबरला मतदान आहे. कसगी संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारपासुू (ता. २२) सुरू होत असून २३ डिसेंबरला मतदान आहे. चिंचोली (जहागीर) संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारपासून (ता.१८) सुरू झाला असून २८ डिसेंबरला मतदान आहे. या तीन संस्थेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सहायक सहकार अधिकारी डी.डी. चिवडे काम पाहत आहेत. समुद्राळ संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारपासुन (ता. २२) सुरू होत असून २६ डिसेंबरला मतदान आहे. तलमोडवाडी संस्थेच्या निवडणुकीचा (Osmanabad) कार्यक्रम गुरुवारपासून (ता.१८) सुरू झाला असून २४ डिसेंबरला मतदान आहे. या दोन संस्थेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन मुख्य लिपीक एस.जी. माळी काम पाहत आहेत. (Cooperative Societies Election)

हेही वाचा: Nanded : गांजा प्रकरणातील दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

भूसणी संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारपासुन (ता.१८) सुरू झाला असून २५ डिसेंबरला मतदान आहे. नारंगवाडी पूर्व संस्थेचा निवडणूक कार्यक्रम सोमवारपासुन (ता.२२) सुरू झाला असुन २९ डिसेंबरला मतदान आहे. सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एन.डी. हाडोळे या दोन संस्थेचे काम पाहत आहेत. दगडधानोरा संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारपासुन (ता. १८) सुरू झाला असून २५ डिसेंबरला मतदान आहे. कराळी संस्थेच्या निवडणूकीचा कार्यक्रम सोमवारपासून (ता. २२) सुरू झाला असून २८ डिसेंबरला मतदान आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सहायक सहकार अधिकारी पी.सी. सुनापे काम पाहत आहेत. दावलमलीकवाडी संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारपासुन (ता.१८) सुरू झाला असून २८ डिसेंबरला मतदान आहे. मळगी संस्थेच्या निवडणूकीचा कार्यक्रम सोमवारपासुन (ता. २२) सुरू झाला असून २५ डिसेंबरला मतदान आहे. उपलेखा परीक्षक व्ही.एम. कातपुरे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहत आहेत. येणेगूर संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारपासुन (ता.१८) सुरू झाला असून २६ डिसेंबरला मतदान आहे. पळसगांव संस्थेच्या निवडणूकीचा कार्यक्रम सोमवारपासुन (ता.२२) सुरू झाला असून २५ डिसेंबरला मतदान आहे. लेखापरीक्षक एम. सी. शेख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहत आहेत. पेठसांगवी संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारपासून (ता. २२) सुरू झाला असून २८ डिसेंबरला मतदान आहे. लेखापरीक्षक श्री. सुगावे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहत आहेत.

हेही वाचा: जास्त मायलेज देणारी 'Bajaj Platina 100' खरेदी करा ४० हजारात

इच्छुकामध्ये स्पर्धा पण ....

सेवा संस्थेचा अध्यक्ष व सदस्य होणे म्हणजे ग्रामीण भागात प्रतिष्ठा समजली जाते. पूर्वी संस्थेचे अर्थकारण मोठे होते. शेती कर्जासाठी संस्था महत्त्वाची होती. आता संस्थेचे बजेट फारसे नाही. तत्कालिन स्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामुळे सेवा संस्थेच्या अर्थकारणाला मर्यादा आल्या. आता चौदा संस्थेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी इच्छूक आहेत. मात्र निवडणुकीत रंगतदारपणा येणार नाही. सेवा संस्थेची स्थिती, कोरोनाचा काळ आणि गावाअंतर्गत राजकारणामुळे उद्भवणारे कटू प्रसंग टाळण्यासाठी या निवडणुका सांमजस्यपणाने बिनविरोध व्हाव्यात असे अपेक्षित वाटते.

loading image
go to top