बहिणीच्या लग्नासाठी निघालेल्या युवकावर काळाचा घाला

नळदुर्ग : रस्त्याच्या कडेला पडलेली अपघातग्रस्त दुचाकी.
नळदुर्ग : रस्त्याच्या कडेला पडलेली अपघातग्रस्त दुचाकी.

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : चुलत बहिणीच्या लग्नासाठी दुचाकीने गावाकडे निघालेल्या भावावर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला, तर अन्य एकाची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी (ता. २४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहराजवळील आलियाबाद पुलाजवळ ही घटना घडली.

औरंगाबाद येथे नोकरीला असलेला उल्हास सोमवंशी (वय ३०) हा युवक सागर पाटील (वय २८, दोघेही रा. आष्टाकासार, ता. लोहारा) याच्यासोबत चुलत बहिणीच्या लग्नासाठी औरंगाबादहून बुधवारी (ता. २४) पहाटे गावाकडे निघाला होता.

नळदुर्गमार्गे दुचाकीने (एमएच २० बीपी ३३८१) ते आष्टाकासारकडे जात होते. नळदुर्गजवळील आलियाबाद पुलाजवळ असताना सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने (एमएच २५ यू ४०४५) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

या अपघातात उल्हास सोमवंशी याचा जागीच मृत्यू झाला, तर सागर पाटील हा गंभीर जखमी झाला. गावापासून काही अंतरावर असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली.

अपघातानंतर वाहनासह फरारी झालेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी अणदूरजवळ ताब्यात घेतले. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com