उस्मानाबादेत आणखी एकाचा मृत्यू, कोरोनाबळीची संख्या अकरावर

मंगळवार, 30 जून 2020

मृताच्या पत्नीला ही कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात एका ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या आता अकरावर पोहोचली आहे. सोमवारी (ता. २९) रात्री तुळजापूर येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

वयोवृद्ध असल्याने त्यांना उस्मानाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल केले तेव्हापासून त्यांना कोरोनची बाधा झाली असल्याचे बोलले जात असल्याने उस्मानाबाद शहरात कोरोनाचा धोका वाढला असल्याचे चित्र आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

तुळजापूर शहरातील एका वृद्धाला विविध आजाराने ग्रस्त होते. उस्मानाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्याला खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

रविवारी त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर पुन्हा तब्येत खालावल्याने रात्री दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर त्यांना तेथेच कोरोनाची बाधा झाली असल्याचे बोलले जात आहे. रम्यान, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनाही याबाबत त्यांच्या प्रवासाची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या रुग्णाला नेमके कुठे कोरोनाची बाधा झाली. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचा धोका वाढला असल्याचे चित्र आहे.