उस्मानाबाद : तालुक्यातील कौडगाव शिवारात पकडण्यात आलेला मद्याचा साठा.
उस्मानाबाद : तालुक्यातील कौडगाव शिवारात पकडण्यात आलेला मद्याचा साठा.

बनावट विदेशी मद्याची कॅरेटमधून वाहतूक

उस्मानाबाद : भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅरेटमधून बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एकास वाहनासह उत्पादन शुल्क विभागाने पाठलाग करून पकडले. तर एकजण फरारी झाला. या वाहनातून ३०० लिटर बनावट मद्यासह पाच लाख सात हजार ८२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी (ता. एक) पहाटे दीडच्या सुमारास तालुक्यातील कौडगाव शिवारात ही कारवाई केली.

प्रशासनाने मद्यविक्रीस प्रतिबंध केला असतानाही चोरट्या पद्धतीने मद्याची विक्री सुरू असल्याची माहिती एका खबऱ्याकडून उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. बार्शी उस्मानाबाद रोडवर कौडगाव शिवारात अधिकारी, कर्मचारी बुधवारी (ता. एक) पहाटे एकच्या सुमारास थांबले होते.

त्याचवेळी बार्शीहून एक टेंपो (एमएच- ०५, के- ९७९६) रस्त्याने जात होता. थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने पलायन केले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. टेंपोची तपासणी केली असता भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅरेटमध्ये मद्य लपविल्याचे आढळून आले. बनावट देशी व विदेशी मद्यसाठा, चारचाकी वाहन अशा पाच लाख सात हजार ८२२ रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. पोलिसांनी बळीराम मनोहर शिंदे (रा. नारेवाडी, ता. बार्शी) यास अटक केली. तर सागर बारंगुळे हा फरारी झाला.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत, निरीक्षक एम. एस. गरुड, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस. पी. काळे, सी. डी. कुंठे, डी. व्ही. भराट, एस. के. शेटे, एम. पी. कंकाळ, व्ही. आय. चव्हाण, आर. आर. गिरी, बी. बी. भंडारे, टी. एच. नेर्लेकर, वाहनचालक एजाज शेख यांनी ही कारवाई केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com