कॅनव्हासवर साकारले सावळे रूप सुंदर...!

तुळजापूर : चित्रकार दिग्विजय कुंभार यांनी रेखाटलेले विठ्ठलाचे चित्र.
तुळजापूर : चित्रकार दिग्विजय कुंभार यांनी रेखाटलेले विठ्ठलाचे चित्र.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कोरोनामुळे आषाढी वारीचा सोहळा यंदा नेहमीसारखा नाही. वारकऱ्यांसाठी पर्वणी असलेल्या ठिकठिकाणच्या दिंड्या पंढरपूरला जाऊ शकलेल्या नाहीत.

वारकऱ्यांना चैतन्य देणारा, भाविकांच्या मनामनांत रुजलेल्या या सोहळ्यातील काही आठवणी ऑनलाइनसह अन्य मार्गांनी जागृत करून विठुरायाचा जागर करण्यावर भर दिला जात आहे. येथील प्रसिद्ध चित्रकार दिग्विजय कुंभार यांनी तर कॅनव्हासवर सावळे रूप रेखाटून वारीचा आनंद लुटला आहे.

कलावंत, चित्रकाराला आपल्या भावना कुंचल्यातून मांडता येतात, या भावनेतून पाच दिवस राबून दोन बाय अडीच आकाराच्या कॅनव्हासवर, ॲक्रॅलिक रंगांच्या वापराने विठ्ठलाचे सावळे रूप रेखाटल्याचे त्यांनी सांगितले. 
कुंभार म्हणाले, की कोरोनाच्या संकटामुळे आषाढी वारीत पंढरपूरमध्ये नेहमीप्रमाणे यंदा वारकऱ्यांची मांदियाळी नसेल.

प्रशासनाने साधेपणाने आषाढीचा सोहळा करण्याचे ठरविले आहे. वर्षानुवर्षे पंढरीची वारी करणारे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला यंदा मुकणार आहेत. विठ्ठलाची ओढ प्रत्येक भक्ताला असते, तशी मलाही आहे. विठ्ठलभक्त म्हणून मी साक्षात पांडुरंग चित्रातून उभा केला आहे. वडील दत्तात्रय कुंभार यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या स्मृतीस मी हे चित्र अर्पण केले आहे. 

पंढरीत चित्र काढण्याची इच्छा 
कुंभार यांनी वाराणसी येथे महादेवाचे आणि ब्रह्मदेवाचे चित्र रेखाटले आहे. प्रयागराज येथे शंकराचे चित्र रेखाटले आहे. तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी महत्मा गांधी यांचे चित्र रेखाटले होते.

तुळजाभवानीमाता मंदिरातील गाभाऱ्यासमोर काही तास उभे राहून त्यांनी तुळजाभवानीमातेचे चित्र रेखाटले होते. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात उभे राहून चित्र काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com