मुलीवर अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

उस्मानाबाद - अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी शुक्रवारी सुनावली आहे. सहा ऑगस्ट 2016 रोजी उस्मानाबाद शहरात हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी जलदगतीने तपास केला असून, 14 महिन्यांत याचा निकाला लागला आहे. आरोपी हा पोलिस खात्यातील अधिकारी असतानाही जलदगतीने प्रकरणाचा तपास करून आरोपी कायद्यासमोर समान असतो, हे पोलिसांनी दाखवून दिले. या प्रकरणासाठी गृहविभागाकडे पाठपुरावा करून पोलिसांनी राज्य शासनाकडून विशेष सरकारी वकीलही मिळविला होता. सरकारकडून पी. वाय.

उस्मानाबाद - अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी शुक्रवारी सुनावली आहे. सहा ऑगस्ट 2016 रोजी उस्मानाबाद शहरात हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी जलदगतीने तपास केला असून, 14 महिन्यांत याचा निकाला लागला आहे. आरोपी हा पोलिस खात्यातील अधिकारी असतानाही जलदगतीने प्रकरणाचा तपास करून आरोपी कायद्यासमोर समान असतो, हे पोलिसांनी दाखवून दिले. या प्रकरणासाठी गृहविभागाकडे पाठपुरावा करून पोलिसांनी राज्य शासनाकडून विशेष सरकारी वकीलही मिळविला होता. सरकारकडून पी. वाय. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

शहरातील शाहूनगर भागात राहणारा पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार सुखदेव बनसोडे (वय 27) हा सांगलीच्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत होता. सात दिवसांची सुटी काढून बनसोडे हा गावी आला होता. जवळच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शुक्रवारी पाच ऑगस्ट 2016 रोजी सकाळच्या सुमारास ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेतला. आरोपी प्रेमकुमार बनसोडे याने मुलीला वह्या दाखविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या खोलीत नेले आणि तुझ्यावर माझं प्रेम असल्याचे सांगत शरीरसंबंधांची मागणी केली. मुलीने नकार दिला तेव्हा त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

Web Title: osmanabad news crime Police Inspector