'ग्रीन लिस्ट' काढून टाकण्याची सरकारवर नामुष्की

तानाजी जाधवर
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

ग्रीन लिस्टमध्ये प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांची नावे नसल्याचे उघड झाले. सरकारवर नामुष्की ओढावली. त्याच दिवशी हा कार्यक्रम घेणे बंधनकारक केल्याने सहकार विभागाने त्यांच्या स्तरावर लाभ मिळतील अशी नावे काढली होती. पण त्यांची नावे यादीत न आल्याने सगळा गोंधळ उडाला होता. दै. सकाळने ही बाब सर्वप्रथम निर्दशनास आणुन दिली.

उस्मानाबाद : कर्जमाफी झाली असं म्हणत सरकारने ग्रीन लिस्ट प्रदर्शित केली होती. मात्र उस्मानाबादमध्ये प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांची नावेच या ग्रीन लिस्टमध्ये नव्हती. त्यामुळे सरकारने ही ग्रीन लिस्ट दुरुस्त कऱण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे. संकेतस्थळावर आता 'अपडेटिंग' अस पाहायला मिळत आहे. सरकारच्या घाईमुळे प्रशासनावर ग्रीन लिस्ट काढून टाकण्याची नामुष्की ओढावल्याचे वास्तव समोर आले आहे.

प्रत्यक्ष कर्जमाफीला वेळ लागत असल्याने सरकारविरोधात रोष वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीचा दिवस निश्चित करून तो जाहीर केला. ठरलेल्या दिवशी (ता. 18 ऑक्टोबर) प्रातनिधिक स्वरुपात लोकांना प्रमाणपत्र वाटण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते तर राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. दोन दिवसानंतर त्यातील त्रुटी दिसून येऊ लागल्या. ग्रीन लिस्टमध्ये प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांची नावे नसल्याचे उघड झाले. सरकारवर नामुष्की ओढावली. त्याच दिवशी हा कार्यक्रम घेणे बंधनकारक केल्याने सहकार विभागाने त्यांच्या स्तरावर लाभ मिळतील अशी नावे काढली होती. पण त्यांची नावे यादीत न आल्याने सगळा गोंधळ उडाला होता. दैनिक सकाळने ही बाब सर्वप्रथम निर्दशनास आणून दिली.

दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी आल्याने त्यामध्ये काही बदल कऱणेही शक्य नव्हते. त्यामुळे सोमवारी सकाळीच या संकेतस्थळावरील प्रदर्शित कऱण्यात आलेल्या यादीमध्ये दुरुस्ती कऱण्याचे काम सुरू झाले. घाईगडबडीत प्रदर्शित केलेल्या यादी काढून टाकण्याची नामुष्की सरकारवर ओढावली असून किमान आता तरी यातून सरकार बोध घेईल, अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: osmanabad news farmer loan waiver green list fiasco