धान्य खरेदी केंद्रांसाठी राष्ट्रीय महामार्ग अडवून राष्ट्रवादीचे रास्तारोको

शासकिय आधारभुत खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग वाशी फाटा येथे रास्ता रोको.
शासकिय आधारभुत खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग वाशी फाटा येथे रास्ता रोको.

वाशी (जि. उस्मानाबाद) : शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्याच्या मागणीसाठी सोमवार (ता. सहा) रोजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग अडवून वाशी फाटा येथे रास्तारोको आंदोलन सुरू झाले आहे. या रास्तारोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग जवळपास एकतास वाहुतुकीसाठी बंद पडला होता. यावेळी महामार्गावर वाहनांची दोन्ही बाजूला जवळपास सहा किलोमीटरपर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या.

सोमवार (ता. ०६) रोजी सोलापूर औरंगाबाद या महामार्गावर वाशीफाटा येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र त्वरीत सुरु करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी  रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका खरेदी विक्री संघ यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी लेखी प्रस्ताव देऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी झालेला आहे. मात्र याउलट जिल्हा राज्य व केंद्रिय प्रशासन गंभीर नसून, प्रत्यक्ष खरेदी केंद्र सुरू न करता जाहिरातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार राहुल मोटे हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून दररोज नवनवीन जाचक अटी घालून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अहवेलना करत आहे.

ऑनलाईन उत्पादकता आदी जाचक अटी रद्द करुन शासकीय धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे. यावेळी आमदार राहुल मोटे यांच्या पत्नी वैशाली ताई मोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. सुर्यकांत सांडसे बाजार समितीचे संचालक विकास पवार प्रशांत कवडे तालुका अध्यक्ष भास्कर शिंदे संतोष कवडे संतोष कवडे संतोष पवार महादेव जाधव महादेव आखाडे लक्ष्मण परंडकर नानासाहेब उंदरे दत्ताञय चेडे काका मोरे समशोद्दीन काझी लतीफ पटवेकर राजेश्वर कवडे बळीराम चेडे सदाशिव पवार यांची उपस्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com