उस्मानाबाद: कळंब बसस्थानकावर एसटी चालकाला मारहाण; बससेवा बंद

दिलीप गंभीरे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कळंब (जि. उस्मानाबाद) : बसस्थानकावर बस वळविताना एकाने बसचालकाला मारहाण केल्यामुळे कळंब बसस्थानकातून दुपारी साडेबारापासून बससेवा बंद करण्यात आली आहे. संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय बससेवा सुरू न करण्याचा निर्धार एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. आज (सोमवार) दुपारी हा प्रकार घडला.

बसचालक सुरेश तंबारे हे बसस्थानकातच बस वळवित असताना एकाने त्यांना मारहाण केली. हा प्रकार दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. त्यानंतर बसस्थानकात उपस्थित चालक एकत्रित आले. मारहाण करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुरू केली. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला होता. संबंधितावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय बससेवा सुरू न करण्याचा निर्णय चालकांनी घेतला. काहीजणांना आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारही बंद केले. त्यामुळे कळंब बसस्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही.

बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. दुपारी अडीचच्या सुमारास एसटीचे कर्मचारी, आगारप्रमुख पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. तेथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

Web Title: osmanabad news kalamb bus stop st driver hitting