कमल कुंभार यांना निती आयोगाचा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

उस्मानाबाद - तालुक्‍यातील हिंगळजवाडीसारख्या लहानशा खेड्यातील श्रीमती कमल कुंभार या महिलेने स्वतःचा व्यवसाय सांभाळत, सुमारे चार हजार महिलांना विविध व्यवसायांत प्रशिक्षित करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याचा मार्ग दाखविला आहे. शून्यातून शेती आणि जोडधंदा फुलविण्याची किमया त्यांनी केली. या कार्याबद्दल त्या निती आयोगाच्या ‘वुमन ट्रान्सफॉर्म’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. 

श्रीमती कुंभार यांनी कडकनाथ कोंबडी, हायड्रोफोनिक चारा, अझोला उत्पादनाच्या माध्यमातून व्यवसायात भरारी घेतली आहे. भाड्याने शेती घेऊन त्यात त्यांनी विविध उत्पादने, व्यवसायाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या कुटुंबाला अवघी दीड एकर कोरडवाहू शेती आहे.  बांगडी व्यवसाय, शेळीपालनानंतर त्यांनी कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला. शासनाच्या जीवनोन्नती अभियानातल्या पशुसखीच्या माध्यमातून शेळ्या तसेच कोंबड्यांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन केले जाते.  श्रीमती कुंभार यांच्या या आदर्श कामगिरीमुळे त्यांना दोन वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘यशस्वी उद्योजिका’ म्हणून गौरविण्यात आले. देशातील ३५० महिलांतून त्यांची त्यावेळी निवड करण्यात आली आहे. 

निती आयोगाचा पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळाली आहे. यापुढेही महिलांसाठी काहीतरी करण्याची धडपड सुरूच राहणार आहे. पण, महिलांना संघटित करून मोठा उद्योग उभारण्याचा मानस आहे. वेगवेगळ्या व्यवसायांत महिलांनी एकत्र येऊन काम केले तर निश्‍चित यश मिळते, असे मला वाटते.
- कमल कुंभार, व्यावसायिक  

Web Title: osmanabad news kamal kumbhar Niti Commission Award