"मनसे' मराठवाड्याच्या दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

उस्मानाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या भेटी घेण्यासाठी मंगळवारपासून (ता. 27) दौरा सुरू होणार असल्याची माहिती "मनसे'च्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे. पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या दोन टीम यासाठी तयार करण्यात आल्या असून, एक टीम औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली असा दौरा करणार असून, दुसरी टीम नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या भागात जाणार आहे.
Web Title: osmanabad news mns marathwada tour politics