सहायक पोलिस निरीक्षकाच्या पत्नीची गोळ्या झाडून आत्महत्या

तानाजी जाधवर
गुरुवार, 25 जानेवारी 2018

उस्मानाबाद: येरमाळा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना यांनी पिस्तुलच्या गोळ्या पोटात झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

उपचारासाठी त्यांना बार्शी (जि.सोलापुर) येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गूरुवारी (ता. 25 ) सकाळी नऊ साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना येरमाळा येथील राहत्या घरात घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. श्री. चव्हाण यांच्याच पिस्तुलचा वापर करत त्यानी गोळ्या झाडल्या आहेत.

मोना चव्हाण यांचे वडील देखील पोलिस कर्मचारी असून, बीड जिल्ह्यातील शिरुर पोलिस ठाण्यात सध्या ते सेवेत आहेत.

Web Title: osmanabad news police officers wife suicide