अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलिस उपनिरीक्षकास सक्तमजुरी

तानाजी जाधवर
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

उस्मानाबादः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे यास दहा वर्षाची सक्तमजुरी व एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने आज (शुक्रवार) सुनावली. सहा ऑगस्ट २०१६ रोजी उस्मानाबाद शहरात हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपीला १४ महिन्यांत शिक्षा ठोठावली आहे.

काय होतं प्रकरण -
उस्मानाबाद शहरातील शाहूनगर भागात राहणारा पोलिस निरीक्षक प्रेमकुमार सुखदेव बनसोडे (वय २७) हा सांगली येथील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत होता. सात दिवसांची सुट्टी काढून तो गावी आला होता.

पाच ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जवळच राहणा-या एका अल्पवयीन (वय १६) मुलीला ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपी प्रेमकुमार बनसोडे यांने तुला वह्या दाखवतो म्हणून स्वत:च्या रूममध्ये नेले. तुझ्यावर माझे प्रेम असल्याचे सांगत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मुलीने नकार दिला तेव्हा त्याने तिला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता.

जलद तपास :
आरोपी हा पोलिस खात्यात अधिकारी असल्याने पोलिसांची भुमिका कशी राहील, यावर याबाबत अनेकांनी प्रश्न चिन्ह उभे केले होते. मात्र, हा संशय दुर करत आरोपी कोणीही असो कायद्याच्या समोर तो समान असतो हे दाखवून देत पीडीत मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकरणाचा तपास तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली घाडगे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.

राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून पी. वाय. जाधव यांची या प्रकरणी नियुक्ती केली होती.

Web Title: osmanabad news police sub inspector 10 year police custody