उपनिरीक्षकासह ‘ते’ चार पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

उस्मानाबाद - नळदुर्ग पोलिस ठाण्यांतर्गत फुलवाडी (ता. तुळजापूर) जवळ झालेल्या हैदराबाद येथील सराफाच्या कारवरील दरोड्यातील लाखोंची रक्कम चोरट्याकडून संगनमत करून लाटल्याप्रकरणातील आरोपी व सध्या अटकेत असलेले नळदुर्ग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल किरवाडे व तीन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज तडकाफडकी निलंबित केले. जिल्ह्यातील पोलिस दलाची बेअब्रू करणाऱ्या या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आज सकाळीच या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

या प्रकरणी चोरट्यांनी १८ जून रोजी मध्यरात्री फुलवाडीजवळ हैदराबादहून मुंबईला जाणाऱ्या सराफाच्या गाडीतील व्यापाऱ्यांना मारहाण करून मोठी रक्कम लुबाडली होती. त्यानंतर या दरोड्यात हैदराबादच्या व्यापाऱ्याच्या कारचा चालक सुरेंद्रसिंग राजपूत हाही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यावरून सुरेंद्रसिंग राजपूत पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला तपासासाठी कर्नाटकात (जि. बल्लारी) घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एक अधिकारी व दोन पोलिस कर्मचाऱ्यांसमक्ष त्याने पलायन केले होते. त्याने पलायन केले नसून या पोलिस पथकाने त्याच्याकडून मोठी रक्कम घेतल्याची व त्याला पळवून लावल्याची चर्चा जिल्ह्यात दबक्‍या आवाजात सुरू होती. त्यामुळे या सगळ्या पथकाने केलेल्या तपासावर जिल्हा पोलिस अधीक्षकांना शंका होती. त्यांनी नेमलेल्या दुसऱ्या पथकाच्या चौकशीत संशयिताकडून या पोलिसांनी मोठी रक्‍कम हडप केल्याची माहिती खरोखरच समोर आल्याने पोलिस दलाला धक्का बसला होत. त्यानुसार पहिल्या पथकातील एक पोलिस कर्मचारी राजू चव्हाण यांच्या उस्मानाबादेतील घरी तपासणी केली असता त्यांच्याकडून ४४ लाखांची रक्कम हस्तगत कऱण्यात आली. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अनिल किरवाडे, कर्मचारी मनोज भिसे, नरसिंग दिघोळ व तुळजापूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी राजू चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई पोलिस अधीक्षकांकडून करण्यात आली आहे.

Web Title: osmanabad news police Suspended