साखरेच्या दराने कारखानदार अडचणीत 

तानाजी जाधवर
गुरुवार, 4 जानेवारी 2018

उस्मानाबाद  - उसाच्या हंगामाला नोव्हेंबरमध्ये सुरवात झाली, तेव्हाच दराबाबत उत्सुकता होती. तेव्हा जिल्ह्यात दोन हजार दोनशे रुपयांचा भाव देऊन कारखान्यांनी उचलीचा तिढा सोडविला; मात्र त्यानंतर म्हणजे डिसेंबरपासून साखरेच्या दरात घसरण व्हायला सुरवात झाली आहे. आता पुढच्या हंगामात कृषिमूल्य आयोगाने "एफआरपी'मध्ये (किमान आधारभूत मूल्य) प्रतिटन दोनशे रुपयांची वाढ सुचविली असून, ऊस उत्पादकांना हा दर देण्यासाठी कारखानदारांनी या वर्षीपासून नियोजन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. 

उसाचा "एफआरपी' भाव हा हंगाम सुरू होण्यापूर्वी निश्‍चित करण्यात येतो. तेव्हा विविध राज्यांतील उसाचा उत्पादन खर्च, साखरेचा वर्षभराचा दर, कारखान्याचा खर्च, ग्राहकांना परवडणारा साखरेचा दर याचा विचार केला जातो. त्यानंतर एफआरपीची घोषणा केली जाते. बाजारातील साखरेचे दर कोसळले, की वर्षभरातील साखर दराची पातळी विचारात घेऊन "एफआरपी' ठरल्याने कारखाने चांगलेच अडचणीत येतात. 2016 च्या ऑक्‍टोबरमध्ये साखरेचे दर प्रतिक्विंटल तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होते. तेच 2017 च्या एप्रिलमध्ये ते तीन हजार सहाशे रुपयांवर गेले. 2017 च्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तीन हजार सातशे रुपयांच्या आसपास गेले; पण उसाच्या कमतरतेची भीती, स्पर्धक कारखान्यांची उचल आणि साखरेचे दर चढेच राहतील, अशी अपेक्षा साखर कारखानदारांना होती; मात्र तीन हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल असणारा साखरेचा दर आता तीन हजार शंभर रुपयांवर खाली आला आहे. ही सहाशे रुपयांची घसरण कारखानदारांना मोठा धक्का देणारी तर आहेच; पण याने पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसणारी ठरू शकते. आता जाहीर केलेला दर देताना कारखानदारांची दमछाक होणार असली तरी गेल्या वर्षी कारखाने बंद राहिल्याने तोटा भरून काढण्यासाठी कारखानदारांमध्ये चांगलीच स्पर्धा आहे. ही स्पर्धा यंदा शेतकऱ्यांसाठी पोषक असली तरी पुढच्या हंगामात चिंता वाढण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. 

Web Title: osmanabad news sugar factory sugar