उस्मानाबाद: बस-दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी जखमी

तानाजी जाधवर
बुधवार, 21 मार्च 2018

रोहीत रमेश पडनुर, प्रथम संजय सजन हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिसऱ्याला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला परिक्षा केंद्रावर पोहचविण्यात आले. या अपघातामुळे दोन विद्यार्थ्यांना परिक्षेला मुकावे लागले आहे.

उस्मानाबाद  : तुळजापुरहुन उस्मानाबादकडे दहावीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला पाठीमागुन येणाऱ्या शिवशाही बसने धक्का दिल्याने अपघात झाला. यात दुचाकीवरील तिघांपैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, तुळजापुर येथून दहावीचा पेपर देण्यासाठी बुधवारी (ता. २१) तिघेजण दुचाकीवरून (क्र. एम.एच.२५ -४११७) उस्मानाबादकडे निघाले होते. समाधान ढाब्याजवळ आल्यावर पाठीमागुन वेगाने येणारी शिवशाही बसची (एम.एच.०६ - ०३९९) दुचाकीला जोराची धडक बसली. त्यामुळे तिघेही गाडीसह रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले तर तिसरा किरकोळ जखमी झाला.

रोहीत रमेश पडनुर, प्रथम संजय सजन हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तिसऱ्याला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला परिक्षा केंद्रावर पोहचविण्यात आले. या अपघातामुळे दोन विद्यार्थ्यांना परिक्षेला मुकावे लागले आहे.

Web Title: Osmanabad news two injured in accident