उमरगा भाजपचे माजी तालुकाध्यक्षांचा औशाजवळील अपघातात मृत्यू, पती-पत्नी जखमी

अविनाश काळे
Sunday, 31 January 2021

बालाजी कोराळे हे तुगाव येथून रविवारी सकाळी दुचाकीवरून (एमएच २५ एसी ९५७४) कामानिमित्त लातूरला जात असताना औसा गावाजवळ चुकीचे दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील तुगावचे रहिवाशी, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष, माजी तालुकाध्यक्ष बालाजी दत्तात्रय कोराळे (वय ५२) यांचे रविवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास औसामोड (ता.लातूर) येथे अपघाती निधन झाले. या बाबतची माहिती अशी की, बालाजी कोराळे हे तुगाव येथून रविवारी सकाळी दुचाकीवरून (एमएच २५ एसी ९५७४) कामानिमित्त लातूरला जात असताना औसा गावाजवळ चुकीचे दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेसहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळत कसे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’ यासह विविध घोषणांनी अंबड दणाणले

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान कोराळे यांना प्रतिकुल परिस्थितीत स्वतःची ओळख आणि भाजपचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. भाजपचे तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन काम केले होते. सध्या ते पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होते. राजमाता जिजाऊ बहुद्देशीय संस्था, आष्टा कासार संचलित धर्मवीर संभाजी विद्यालय भोसगा याचे संस्थापक अध्यक्ष होते.

औरंगाबाद- नगर रस्त्यावर नातेवाईकाकडे निघालेल्या दुचाकीस जोरदार धडक; महिला ठार, एक गंभीर जखमी

दोन स्कूटीच्या अपघातात तिघे जखमी
राष्ट्रीय महामार्गावरील बलसूर पाटीजवळ दोन स्कुटी दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने पती-पत्नीसह एक जेष्ठ नागरिक जखमी झाला आहे. रविवारी (ता.३१) सकाळी दहाच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर बलसूर मोड येथे हा अपघात झाला. याबाबतची माहिती अशी की, उमरग्याहून लोहारा तालुक्यातील तोरंबा गावाकडे स्कुटीवरून जाताना बलसूर पाटीवर समोरून येणाऱ्या स्कुटीची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात पांडुरग तुळशीराम भोसले वय ७० वर्ष, सकुमारबाई पांडुरंग भोसले (वय ६० रा. दोघेही  उमरगा) हे पती-पत्नी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थेची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर दाळींबहुन उमरग्याकडे निघालेले मंहमद हुसेन शेख (वय ६०)  गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मराठवाड्याच्या ताज्य बातम्या वाचा
 

धोकादायक वळण
बलसूर मोड अपघाताचे केंद्र झाले आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या वेळी या ठिकाणी भुयारी मार्गाचा पर्याय करायला हवा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी यासाठी आंदोलनही केले होते. मात्र महामार्ग प्राधिकरणाने त्याची दखल घेतली नाही. बलसूर मार्ग जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. मात्र रस्ता ओलांडताना धोका पत्करावा लागतो आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News Umarga BJP Chief Died In Accident Marathi News