उस्मानाबाद येथे महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त

तानाजी जाधवर
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद : मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाकडून संपुर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार शहरामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठ किलोमीटर पथसंचलन केले. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 24 जुलैला बंद पाळण्यात आला होता. तेव्हा शहरामध्ये काही हिंसक प्रकार घडले होते, शिवाय दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती. त्याचा परिणाम यावेळी पोलीसांनी अधिक खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. या उद्देशाने एक दिवस अगोदरच पोलीस दलाकडून शहरामध्ये पथसंचलन करण्यात आले आहे. यामध्ये 12 अधिकारी, 300 कर्मचारी राज्य राखीव पोलीस दल, शिघ्रगती पोलिस पथकाच्या तुकड्या तसेच हत्यारासह पंधरा वाहनाचा यामध्ये समावेश होता.

सकाळी अकरा वाजता शहर पोलिस ठाण्यापासून पथ संललनास सूरुवात झाली, काळा मारुती, विजय चौक, शम्स चौक, शिवाजी महाराज चौक, कोर्टासमोरुन पुढे समता कॉलनी, बार्शी नाका मार्गे शहर पोलिस ठाण्यामध्ये संचलन पुर्ण कऱण्यात आले. आठ किलोमीटर चा शहराचा भाग पोलिसांनी यावेळी पूर्ण केल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनिल नेवसे यानी सांगितले.

Web Title: In Osmanabad Police Security Tight due to Maharashtra Bandh