उस्मानाबादकरांना दिलासा : २९ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

file photo
file photo

उस्मानाबाद : शहरातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३० नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २९ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. तर एकाचा अहवाल अनिर्णित आला आहे.

उस्मानाबाद शहराची लोकसंख्या सव्वालाखाहून अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखणे एक मोठे आव्हान आहे. त्यातच गेल्या पंधरा दिवसात शहरात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. हे तिन्ही रुग्ण मुंबई, पुणे येथून आलेले आहेत. अत्यंत दाटीवाटीच्या भागांमध्ये हे तिन्ही रुग्ण आढळून आल्याने शहरासाठी चिंतेची बाब होती. बुधवारी (ता. २७) शहरातील ३० जणांचे तपासणीसाठी पाठवले होते. यापैकी २९ जणांचे स्वब निगेटिव्ह आले असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. सतीश आदटराव यांनी दिली आहे. तर एक अनिर्णीत अहवाल आहे.

शहरात आतापर्यंत तीन कोरोणाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पहिला रुग्ण देवी मंदिर परिसरात आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जोशी गल्लीमध्ये दुसरा रुग्ण आढळून आला होता. त्याच्याही संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तिसरा रुग्ण पापणास नगर परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी आढळून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तेही निगेटिव्ह आले आहेत.

आज गुरुवारी पुन्हा १६ स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. म्हणजे तीनही रुग्णांच्या संपर्कात आलेले सर्व जण निगेटिव्ह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दाटीवाटीच्या क्षेत्रातील बाधित रुग्ण असूनही चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच इतर सर्व जणांचे स्वॅब निगेटिव्ह येत असल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

पालिका प्रशासन आरोग्य विभागाचा एकोपा 
आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन शहरात एकोप्याने काम करीत आहेत. पालिकेमध्ये वॉररूम तयार करण्यात आली आहे. एखादा रुग्ण शहरात आढळला अथवा मुंबई, पुणे येथून आला तरी त्याची तात्काळ माहिती पालिका प्रशासनाला मिळते. त्यानंतर त्वरित संबंधित परिसरात जाऊन त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन केले जाते. प्रभागनिहाय अशी रचना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तरी शहरात कोरोनाचा फारसा प्रसार झाल्याचे दिसून येत नाही. पालिका प्रशासन व आरोग्य विभाग समन्वयाने काम करीत असल्यानेच हे यश मिळत असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com