उस्मानाबाद "आरटीओ'ला दहा हजार रुपयांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

परवाना नूतनीकरणप्रशी ग्राहक मंचचा निकाल 
नूतनीकरणाचा परवाना देताना झाला विलंब 

उस्मानाबाद : दोनवेळा शुल्क भरूनही अवजड वाहन चालविण्याच्या परवान्याचे वेळेत नूतनीकरण करून न दिल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने "आरटीओ'ला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंचने बुधवारी (ता.20) हा निकाल दिला. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

याबाबत अधिक माहिती अशी, की संजय रघुनाथ बारकूल (रा. येरमाळा, ता. कळंब) यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (आरटीओ) अवजड वाहन चालविण्याच्या परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. 26 डिसेंबर 2017 ला बारकूल यांनी नूतनीकरणासाठीचे शुल्क भरले. त्यानंतर वारंवार विनंती करूनही अनेक दिवस परवान्याचे नूतनीकरण करून दिले नाही. बारकूल यांच्याकडून पुन्हा 31 मार्च 2018 ला एक हजार 66 रुपयांचे शुल्क भरून घेण्यात आले. त्यामुळे बारकूल यांनी याबाबत ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली.

हेही वाचा : सत्तासंर्घषाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात बंदोबस्त वाढवला

मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली अन या गावात झाली मारामारी

मंचने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. शिवाय पुरावेही घेतले. त्यावेळी "आरटीओ'कडून नूतनीकरणाचा परवाना देताना विलंब झाल्याचे तसेच दोनवेळा शुल्क आकारल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी "आरटीओ'ने दहा हजार रुपये द्यावेत, असे आदेश मंचने दिले आहेत.

मंचचे अध्यक्ष किशोर वडणे, सदस्य मुकुंद सस्ते, शशांक क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. अर्जदाराकडून ऍड. एम. सी. देशमुख यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad to RTO A fine of ten thousand rupees