Video : थेट कोरोना वार्डातून रिपोर्टींग - कोरोनाच्या वेदना; पण सुविधेबद्दल समाधान 

corona ward osam.jpg
corona ward osam.jpg

उस्मानाबाद : ‘मी कोरोना बाधित झाले. सुरवातीला भीती वाटली. कोविड सेंटरमध्ये आल्यानंतर डॉक्टारांनी धीर दिला. येथील नर्स काळजी घेत आहेत. जेवणही चांगले मिळत आहे. उपचारही चांगले सुरू आहेत’, असे सांगत होते ते जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित.

कोरोनाच्या वेदनांपेक्षाही त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या सुविधांमुळे समाधान दिसत होते.

कोरोना रुग्णांवर उपचार कसे सुरू आहेत. हे जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’ प्रतिनिधीने रविवारी (ता. २०) थेट कोरोना वॉर्डात जा रुग्णाशी संवाद साधला. दरम्यान, या पाहणीत काही त्रृटीही आढळल्या. काही डॉक्टर प्रामाणिक सेवा देत असले तरी काही हजेरीपुरतेच उपस्थित असल्याचे चित्र होते. 

भूम तालुक्यातील सावरगावच्या रुग्णाच्या नातेवाइकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात मिळालेल्या सोयीसुविधाविषयी अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांचा रुग्ण ऑक्सिजनवर होता. आता तो बरा होऊन जनरल वॉर्डामध्ये शिफ्ट झाल्याचे समाधान त्यांनी बोलून दाखविले. याशिवाय काही रुग्णांशी थेट संवाद साधल्यानंतर त्यांनाही ऑक्सिजनची गरज भासत असल्याचे दिसून आले. रुग्णांना आवश्यक त्या प्रमाणात ऑक्सिजन मिळण्याची सोय रुग्णालयाने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे रुग्णांना फायदा होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी जेवण, स्वच्छतेबाबतही काही तक्रार आढळून आली नाही. 

काही डॉक्टरांच्या दांड्या 
काही डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत होते तर काही फक्त हजेरीपुरते उपस्थित दिसून आले. या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. प्रामाणिक सेवा देणाऱ्या डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे; पण अशा काही हजेरीपुरत्याच मोजक्या डॉक्टरांमुळे सरसकट डॉक्टरांच्या कामवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

नर्सेसच्या स्टाफमध्ये बदल गरजेचा 
सध्या शासकीय रुग्णालयामध्ये ७० टक्के काम हे कोविडसाठी सुरू आहे. बाकी नॉन कोविडचे काम होत आहे. या ठिकाणी अनुभवी नर्सेसचा स्टाफ हा नॉन कोविडसाठी वापरला जात आहे; पण जिथे गरज आहे, प्राधान्य आहे तिथे मात्र अननुभवी स्टाफ दिल्यानेही मोठ्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे हा बदल केल्यास निश्चितपणाने त्याचा चांगला परिणाम रुग्णालयामध्ये दिसून येण्यास मदत होईल. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com