उस्मानाबाद : पवनचक्कीच्या निविदेवरून गोळीबार

नितीन बिक्कड यांची जबाबामध्ये माहिती, दोघांवर संशय
crime
crimesakal

उस्मानाबाद : राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष तथा फक्राबादचे (ता. वाशी) सरपंच नितीन बिक्कड यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास सूरू असून बिक्कड यांनी जबाब नोंदविला आहे. पवनचक्कीच्या निविदेवरून (टेंडर) आपल्यावर गोळीबार झाला असून ‘रेन्यु सूर्या रोशनी’ कंपनीचे के. राजाकुमार व कुलदीप देशमुख यांनीच तो घडवून आणल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.

पेट्रोल पंपासंदर्भात बोलणी करण्यासाठी बिक्कड हे १७ जूनला रात्र पारा येथील संपर्क कार्यालयाकडे वाहनाने गेले होते. फक्राबाद शिवारात तोंडाला रुमाल बांधलेल्या व मास्क लावलेल्या दोघांनी हात केल्याने बिक्कड यांनी वाहनाची गती कमी केली. त्यावेळी मास्क लावलेल्याने बंदुकीतून बिक्कड यांच्या दिशेने गोळी झाडली. ती वाहनाच्या काचेवर लागल्याने काहीतरी धोका असल्याचे लक्षात येताच बिक्कड यांनी वाहन पळविले. त्यावेळी संशयितांनी झाडलेली दुसरी गोळी वाहनाच्या पाठीमागे लागली. पारा येथील चौकात आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, रक्तदाब वाढल्याने त्यांनी पारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले.

पवनचक्कीच्या निविदेसाठी हा प्रकार झाल्याचे बिक्कड यांनी पुरवणी जबाबात म्हटले आहे. दिल्ली येथील ‘रेन्यु सूर्या रोशनी’ कंपनीचे जिल्हयात वेगवेगळ्या भागांत पवनचक्कीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील चांदवड, घाटपिंप्री येथील प्रकल्पाचे भागीदारीत काम करायचे होते. त्यामुळे कंपनीचे के. राजाकुमार, कंपनीचे व्हेंडर कुलदीप देशमुख यांना संपर्क साधला होता. हा गोळीबार या कामामुळे झाला असावा असा संशय बिक्कड यांनी जबाबात व्यक्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पवन निंबाळकर तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com