अन्यथा मराठी चित्रपटांना पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती येईल : संदीप सावंत

हरी तुगावकर
रविवार, 23 डिसेंबर 2018

लातूर : मऱाठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे, मराठी चित्रपट पुढे चालला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटात प्रयोग होण्याची गरज आहे. हे प्रयोग झाले नाही तर पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती मराठी चित्रपटांना येईल, असे मत चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
 

लातूर : मऱाठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे, मराठी चित्रपट पुढे चालला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटात प्रयोग होण्याची गरज आहे. हे प्रयोग झाले नाही तर पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती मराठी चित्रपटांना येईल, असे मत चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. येथील अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने रविवारी (ता. २३) सावंत यांच्या `नदी वाहते` या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सावंत लातूरला आले होते.

फिल्म फेस्टीव्हलमध्ये निवडक चित्रपट असतात. मराठीतीलही निवडक चित्रपट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरणारे आहेत. चित्रपट म्हणून तुम्ही मांडणी, कथानक, त्यात काय नवीन शोधता हे महत्वाचे आहे. चित्रपट समजून घेण्याची गरज आहे. चित्रपट पाहून प्रगल्भता वाढू शकते. फिल्म सोसायटींनी या करीता पुढाकार घेतला पाहिजे. शालेय जीवनापासून चित्रपट समजून घेण्याची संस्कृती वाढली पाहिजे. यावर लातूर येथे शिक्षण संस्थाचालकांची दोन दिवसाची कार्यशाळा घेतली तर त्याला सर्व सहकार्य करण्याची ग्वाही  सावंत यांनी यावेळी दिली.

शेतकरी ज्ञान असला तर तो उत्तम शेती करू शकतो. निसर्गाशी तो लवकर कनेक्ट होवू शकतो. यातूनच शेतकरी फिल्म सोसायटी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली. यावेळी अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव शाम जैन, धनंजय कुलकर्णी, सुनील देशपांडे जेवळीकर, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. स्वपनील देशमुख, विवेक माकणीकर उपस्थित होते.

`नदी वाहते` हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा
`नदी वाहते` हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा आहे. पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकास अशी मांडणी या चित्रपटात आहे. तरुणांनी पहावा असा हा चित्रपट आहे. नदीचा योग्य वापर कसा करावा याचा शोध चित्रपटातून घेण्यात आला आहे. नदीचा काठ निष्क्रीय झाला आहे. काठावरची माणसं दूर गेली आहेत. काठ सक्रीय झाला तरच नदी जीवंत राहणार आहे. नदीवर आपलं जगणं अवलंबून आहे. नदी आयुष्याची गरज आहे. नदी ज्या प्रमाणे शोध घेत वाहते, त्याच प्रमाणे हा चित्रपट देखील पुढे पुढे जातो. या चित्रपटात मसाला काही नाही. वास्तवादी हा विषय आहे, अशी माहिती श्री. सावंत यांनी यावेळी दिली.

 

Web Title: Otherwise, the status of Marathi films was fifteen years ago