अबब! बैलाने गिळले मंगळसूत्र अन् पुढं झालं...

प्रल्हाद कांबळे
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

- शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास बैलाने दिली जोराची धडक.

नांदेड : शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास बैलाने जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्याचा उपचारादरम्यान आठ दिवसांनी (ता.24) मृत्यू झाला. या बैलाने एका महिलेचे मंगळसूत्रही गिळले होते. 

लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील शेतकरी दिगांबर (दिनाजी) लिंबाजी सोनवळे हे गुरूवारी (ता. १७) ऑक्टोबर रोजी आपल्या शेतावर जनावरांना चारा-पाणी व काम करण्यासाठी गेले होते. सकाळी दहाच्या सुमारास त्यांना बैलाने जबर धडक दिली. यात ते मोठ्याने ओरडले व खाली पडले. यावेळी शेता शेजारील त्यांचे पुतणे बालाजी सोनवळे हे तिकडे धावले. तिथे गेल्यानंतर त्याने आपला चुलता दिगंबर यांना काय झाल्याचे विचारले. यावेळी त्यांनी बैलानी धडक दिली असून, मुका मार जास्त लागला आहे असे सांगितले. यावरून त्यांनी दिगंबर सोनवळे यांना विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले.

तब्बल त्यांनी आठ दिवस मृत्यूंशी झुंज दिली. अखेर त्यांचा उपचारादरम्यान गुरूवारी (ता. २४) ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर बैलाच्या धडकेतच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने बालाजी सोनवळे यांच्या माहितीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २६) रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक तेलंगे करित आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ox eat Golden Chain in Nanded