Video : बघून घेऊ म्हणताच मुख्याधिकाऱ्यांचा चढला पारा, आमदार मेटेंचे पीए बॅकफुटवर

बीड पालिका
बीड पालिका

बीड - शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना राजकीय पदाधिकारी, नेते आणि त्यांच्या स्वीय सहायकांकडून दमदाटीचे प्रकार घडतात; परंतु मंगळवारी (ता. सात) बीडमध्ये उलट चित्र पाहायला मिळाले. आमदार विनायक मेटे यांचे स्वीय सहायक विनोद कवडे जसे बॅकफटवर जात होते, तसे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांचा आवाज वरच्या पट्टीत चढत गेल्याचे पाहायला मिळाले.

तत्कालीन युती सरकारच्या काळात आमदार मेटे यांनी शहरातील रस्ता व इतर विकास कामांसाठी निधी आणला आहे. या निधीतील कामांच्या पुढील टप्प्यांसाठी नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी विनोद कवडे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे गेले. यावरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली.

>

यादरम्यान "बघून घेईन' असा शब्द विनोद कवडेंच्या तोंडून निघाला, तसा रोहिदास दोरकुळकरांचा पारा चढला. त्यांनी कर्मचाऱ्यांना आवाज दिला तसा कर्मचाऱ्यांचा मोठा घोळका दोरकुळकरांच्या बाजूने उभा राहिला.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

दुसऱ्या बाजूला कवडे आणि अन्य एक असे दोघेच. त्यामुळे साहजिकच दोरकुळकरांचा आवाज चढायला सुरवात झाली. कर्मचाऱ्यांनीही दोरकुळकरांची बाजू घेतल्याने कवडे चांगलेच बॅकफुटवर गेले. अगदी "जाऊ द्या चुकून शब्द गेला' असे कवडे म्हणत असताना "तू काय बघणार माझे' असे वरच्या पट्टीत दोरकुळकर सुनावत राहिले.

म्हणून घडला पालिकेत हा प्रकार 
श्री. दोरकुळकर आणि श्री. कवडे यांच्यात शाब्दिक चमकक आणि त्यानंतर कवडे बॅकफुटवर जाण्याचे कारणही समोर आले आहे. मेटेंच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, विकास कामांसाठी नाहरकत देताना दोरकुळकरांनी पत्रात शब्दच्छल केला होता. तसेच या प्रकाराचे व्हिडीओ शुटिंग आणि विरोधात कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कवडेंना माघार घ्यावी लागली.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विनायक मेटे यांनी शहरातील विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांच्या निधीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजुरी मिळविली. यातील पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून हाती घ्यायच्या कामांसाठी पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्‍यक होते. यासाठी श्री. कवडे अनेक दिवसांपासून पालिकेत खेटे मारत होते.

हेही वाचा - एसटी महामंडळाची हिटलरशाही

कसेबसे दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रातही मुख्याधिकाऱ्यांनी शाब्दिक खेळ केल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, अशी तक्रार होती. त्यामुळे पुन्हा कवडेंनी खेटे मारायला सुरवात केली. अनेक वेळा मुख्याधिकारी दोरकुळकरांना संपर्क केला तरी त्यांची भेट होत नव्हती. अनेक एसएमएस केले तरी त्याला उत्तर येत नव्हते. त्यामुळे मंगळवारी भेट झाल्यानंतर कवडेंच्या तोंडून तसे शब्द गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com