डॉ.गंगाधर पानतावणे यांचा पद्मश्री पुरस्कार नातेवाईकांकडे सुपुर्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबाद : पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अस्मितादर्श चळवळीचे जनक, ज्येष्ठ विचारवंत, लेखक दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांना शासनाने 25 जानेवारी 2018 रोजी जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या नातेवाईकांकडे बुधवार (ता.27) विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सन्मानपूर्वक सुपुर्द केला.

हा पुरस्कार डॉ.पानतावणे यांच्या कन्या नंदिता, निवेदिता यांनी स्वीकारला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते हा पुरस्कार डॉ. पानतावणे यांना 21 मार्च 2018 रोजी वितरीत करण्यात येणार होता. परंतु आजारपणामुळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ.पानतावणे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर 27 मार्च 2018 रोजी त्यांचे निधन झाले. म्हणून हा पुरस्कार स्वत: विभागीय आयुक्त डॉ. भापकर, जिल्हाधिकारी चौधरी यांनी डॉ. पानतावणे यांच्या घरी जाऊन सन्मानाने सुपूर्द केला. सुरूवातीला डॉ. भापकर, श्री. चौधरी यांनी डॉ. पानतावणे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शासनाने जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या नातेवाईकांकडे सुपुर्द केला.

यावेळी डॉ.पानतावणे यांचे कुटुंबीय मिलिंद अवसरमल, अमोल वाघमारे, एम.डी. बनकर, करुण भगत, प्रमोद खोब्रागडे, प्रा. लेखचंद मेश्राम, अजय आठवले व बंधु प्रभाकर पानतावणे यांची उपस्थिती होती. प्रशासनामार्फत उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, शिवाजी शिंदे, तहसीलदार शिंदे, अपर तहसीलदार रमेश मुंडलोड यांची उपस्थिती होती.

Web Title: padmashree award of gangadhar pantawane take to the relatives