पद्मावती प्रकल्प आता ओव्हरफ्लो 

वालसावंगी (ता. भोकरदन) : पद्मावती प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी. 
वालसावंगी (ता. भोकरदन) : पद्मावती प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी. 

वालसावंगी (जि. जालना) -  अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वालसावंगीसह अन्य गावाला पाणीपुरवठा करणारे पद्मावती प्रकल्प शंभर टक्के भरले आहे, अगदी सांडव्याच्या वरून पाणी वाहत आहे. यामुळे ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वालसावंगी परिसरात सुरवातीला जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही अधूनमधून देखील पाऊस बरसत राहिला. परिणामी धरणाला जाऊन मिळणारे नदी, नाले खळखळून वाहिले. धरणाच्या जलसाठ्यात कमालाची वाढ होत गेली. त्यात गुरुवारी (ता. 22) दुपारी डोंगराळ भागात जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे नदी, नाले पुन्हा खळखळून वाहिल्याने पद्मावती प्रकल्प शंभर टक्के भरला आहे, यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पाण्याचे नियोजन आवश्‍यक 
पद्मावती प्रकल्प भरल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार आहे. मात्र, आगामी काळातील स्थिती लक्षात घेता या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रकल्पात मुबलक जलसाठा असला तरी पाणीचोरी झपाट्याने होते. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा ऐन उन्हाळ्यात मृतसाठ्यात जातो, किंवा प्रकल्प कोरडा होतो असा अनुभव आहे. परिणामी परिसरात भीषण पाणीटंचाई उद्‌भवते, त्यामुळे यंदा पाण्याचे काटेकोर नियोजन करणे, अवैधरित्या होणारा पाणीउपसा थांबविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com