स्वरोदयाच्या श्रीमंतीने नटली पाडवा पहाट

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

अकोला : आल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. अकोलेकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती.

धरीला पंढरीचा चोर, एैरणीच्या देवा तुला, आकाशी झेप घे रे पाखरा, टाळ बोले चिपळीला, घेई छंद मकरंद, आता तरी देवा मला पावशिल का अशा एकाहून एक सरस गीतांनी अकोलेकर मंत्रमुग्ध झाले. 

रत्नम लॉन्स येथे झालेल्या हा स्वरोदय सोहळा प्रारंभापासूनच रंगत गेला. उत्तरोत्तर टाळ्यांसह...क्या बात है...!ची दाद वातावरणात गुंजत राहिली. कर्णमधुर सुरावटींना तबल्याच्या ठेक्याने चढलेला स्वरसाज प्रत्येकाच्या मन ओंजळीत आनंदाची फुले ठेऊन गेला. तबला वादक पवन सिडाम, मृदंग ज्ञानेश्वर, अॉक्टोपस नंदकिशोर माने, किबोर्ड मनोज राऊत, हार्मोनियम धनंजय देशमुख आणि निवेदन डॉ.प्रवीण देशमुख यांच्या साथीने उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. 

स्वरविस्तार बहुउद्देशीय संस्था, अकाेला अंतर्गत स्वरसंगीत अॅकॅडमीच्या बालकलावंतांचा सुरेल भक्तीगीतांचा कार्यक्रम दीपावली पाडव्यानिमित्त ‘सकाळ’ माध्यम समुहाच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित ‘स्वराेदय’ निरागस स्वरांची भक्तीमय पहाट हा विशेष कार्यक्रम जठारपेठ चौकातील रत्नम लॉन्स येथे रसिकश्रोत्यांना मेजवानीच ठरली.

चिमुकलीने वेधले लक्ष
प्रियल पळसपगार हिने गायीलेली ‘जाऊ दे रे मला’ ही गौळण श्रोत्यांना अधिक भावली. चिमुकल्या ओठांमधून आपल्या गायकीने कृष्णाला आळवितांना तिच्या प्रत्येक शब्दाने रसिकांवर मोहिनी घातली. 

घेई छंद मकरंद
गायक गोपाल गावंडे यांनी गायिलेल्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ‘घेई छंद मकरंद’ या गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे हे सुर कळसाध्याय ठरले.

Web Title: Padwa Pahat by Sakal in Akola

टॅग्स